राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर वेतन , 7 वा  वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते , अंशराशीकरण व उपदान अदा करण्यासाठी अनुदानाचे वितरण !

Spread the love

MTV marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Suptember Month Payment ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन , सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते तसेच अंशराशीकरण व उपदानाची रक्कम अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनांकडून लेखाअनुदान अधिनियम 2023 नुसार अनुदानांचे वितरण करण्यात आलेले आहेत .

महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच वेतन / निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने सदर परिपत्रकान्वये वितरण करण्यात आलेले आहेत .सदर परिपत्रक ज्ञापनाद्वारे नमुद करण्यात आलेले आहेत कि , सन 2023-24 या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर 2023 या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष 222020173 / 36 मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतुद फक्त सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता व दुसरा हप्तासाठी अदा करावयाचे आहे असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच लेखाशिर्ष 22020173/04 मध्ये उपलब्ध करुन दिलेली निधीची तरतुद ही सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता , दुसरा हप्ता व अंशराशीकरण , उपदानासाठी अदा करण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .तर उपरोक्त बाबीशिवाय सदर तरतुद ही इतर बाबींवर खर्च न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : 8th Pay Commission : पुढील वर्षी स्थापन होणार वेतन आयोग ! आठवा वेतन आयोगाचे हे आहेत प्रमुख सुत्र , जाणून घ्या सविस्तर !

सदर ज्ञापनाद्वारे वितरीत केलेल्या तरतुदीपैकी रक्कम शिल्लक राहील्यास संचालनालयास कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच लेखाशिर्ष 22020173/36 ची तरतुद केवळ शालार्थ प्रणाली मधुनच अदा करण्यात यावित असे निर्देश देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर लेखाशिर्ष 22020173/04 ची तरतुद आवश्यक असेल तितकीच बीडीएस प्रणालीवरुन खर्ची करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : सेविंग बँक अकाउंट चा नवीन नियम लागू! आता या रकमेवर भरावा लागेल टॅक्स; पहा संपूर्ण माहिती;

या संदर्भात शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment