MTV marathipepar , बालाजी पवार [ shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यातील वेतन अनुदान वितरीत करणेसंदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 18.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम , 2023 सन 2023-24 चे अनुदान वितरण करण्यात आलेले आहेत .सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यालये / आस्थापने / विविध कामे ( शिक्षण विभागांशी संबंधित ) प्रयोजनासाठी लेखाशिर्ष निहाय अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहेत . सदरचे अनुदान हे वित्त विभागांकडून संबंधित विभागांच्या बिम्स प्रणालीवर वितरीत करण्यात आलेले आहेत .
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन / अनुदाने तसेच इतर अग्रीमे मंजुर करीता असताना , वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियमांचे पालन करुनच अनुदान खर्ची टाकण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .लेखाशिर्षनिहाय नियंत्रक अधिकारी व वितरीत अनुदानाची रक्कम खालील प्रमाणे पाहु शकता ..
सदर अनुदान वितरण करणे संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 18.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !