Mtv marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state zp employee old pension scheme paripatrak ] : राज्यातील जिल्हा प्रशासन अंतर्गत कार्यरत असणारे ज्यांची पदभरती जाहीरात / अधिसुचना दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी झालेली आहे अशा प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत राज्याच्या ग्रामविकास विभगांकडून दिनांक 31 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाकडील दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेसाठी …
एक वेळ पर्याय देण्यात आला आहे , तसेच वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहितीसह परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहेत .
तसेच अधिवेशनांमध्ये सम्नानतीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने मा.उपमुख्यमंत्री ( वित्त ) यांनी 3 महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय घेईल असे नमुद केले आहेत .
तरी दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नाव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेसाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार 15 दिवसात शासनास rdd.es4mh@mah.gov.in या मेलवर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024