MTV marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [Teachers Works] : राज्यातील शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे न देण्याबाबत , भारतीय जनता पक्ष महाराष्ट प्रदेश मार्फत राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्री तसेच अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांच्या प्रति निवेदन सादर करण्यात आलेला आहे .
सदर निवदेन पत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील प्रकरण मध्ये शिक्षणाशी संबंधित नसलेली कामे करावयाची नाही अशी स्पष्ट तरतुद आहे . शिक्षकांनी शिक्षणांशी संबंधित नसलेले कामे करायची नाही अशी स्पष्ट तरतुद आहे . शिक्षकांना फक्त जनगणना , प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवसाची संबंधित कामे व आपत्ती व्यवस्थापनाशी सबंधित कामे कराण्याजेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रकरण चार कलम 27 मध्ये नमुद करण्यात आलेला आहे .
असे असून सुद्धा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून बीएओ पर्यवेक्षक अनेक प्रकारचे सर्वेक्षण अशा अनेक अशैक्षणिक कामात गुंतविण्यात आलेले असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम अध्ययन अध्यापनावर होतो . त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना बीएओच्या , बीएलओ पर्यवेक्षकाच्या कामातुन व इतर अशैक्षणिक कामातुन मुक्त करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन द्यावेत अशा प्रकारचे निवेदन देण्यात आलेले आहेत .
भारतीय जनता पक्षाचे पुर्व विदर्भ संयोजक भाजप शिक्षक आघाडीचे संयोजनक अनिल महदेवराव शिवणकर यांच्या मार्फत वरील नमुद मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील निवदेन पत्र खालील प्रमाणे आहे ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !