राज्यातील विविध जिल्ह्यात जानेवारी ते मे 2024 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर GR दि.02.08.2024

Spread the love

MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state farmer held nidhi shasan nirnay ] : राज्यात माहे जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देणेबाबत राज्य शासनांच्या महसुल व वन विभागांकडून दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णयानुसार माहे जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता 596.2195 कोटी ( अक्षरी – पाचशे शहण्णव कोटी एकविस लक्ष पंचाण्णव हजार रुपये फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास शासनांची मंजुरी देण्यात येत आहे .

तर पात्र शेतकरी लाभार्थ्यााच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधीचे वितरण करण्यात येणार आहेत . याकरीता लाभार्थ्यांची माहिती विहीत नमुन्यात काळजीपुर्वक करुन संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच चालु हंगामामध्ये यापुर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरीता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच एका हंगामात एक वेळेस या प्रमाणे विहीत दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच शासन निर्णय महसुल व वन विभाग दि.01 जानेवारी 2024 नुसार जिरायत पिके , बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहीत दरानुसार जास्तीत जास्त 03 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णयांमध्ये विभाग व जिल्हा निहाय बाधित क्षेत्र व बाधित शेतकरी संख्या व वितरीत करण्यात आलेली निधी नमुद करण्यात आलेले आहे , याबाबत सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment