MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee vetan truti nivaran samiti paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित रहाण्याबाबत , वित्त विभागाच्या दिनांक 14 जुन 2024 रोजीच्या पत्राच्या संदर्भिय पत्रानुसार शालेय शिक्षण विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार राज्यातील राष्ट्रीय शिक्षक परिषद , महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेत्तर संघटना के.आर.बांठीया माध्यमिक विद्यालय , सिडको कॉलनी सेक्टर 18 नविन पनवेल जि.रायगड , महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना , आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना , शिक्षकेत्तर महासंघ या संघटनांनी वेतन त्रुटी निवारण बाबत निवेदन सादर केली होती .
त्या अनुषंगाने सदर संघटनांच्या अध्यक्षांना राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने अध्यक्ष वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी / कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आलेले आहेत . सदर पत्रात शालेय शिक्षण विभाग करीता दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 अशी वेळ देण्यात आली आहे .
सदर बैठकीच्या वेळी सदर वरील नमुद संघटनांनी वेतनत्रुटी प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक 05.08.2024 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वाजता मंत्रालय विस्तार इमारत , दुसरा मजला दालन क्र.241 हुतात्मा राजगुरु चौक , मादाम कामा मार्ग मुंबई 400032 येथे बैठकीस जास्तीत जास्त 02 प्रतिनिधींनी उपस्थित रहावेत , अशी विनंती करण्यात आलेली आहे . सदर बैठकी दरम्यान मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल याची नोंद घेण्याचे नमुद करण्यात आले आहेत .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024