या राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी दुर करुन सुधारित वेतनश्रेणी लागु , तब्बल 10 वर्षांची वेतन थकबाकी मिळणार ! GR निर्गमित दि.21.09.2023

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Shasan Nirnay ] : राज्य शासनांकडून सदर नमुद कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना व आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी तसेच सुधारित वेतनश्रेणीनुसार देय होणारी दिनांक 01.01.1996 ते दिनांक 31.03.2006 या कालावधीतील थकबाकी अदा करणेबाबत ग्राम विकास विभागांकडून दिनांक 21.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

5 वा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर नियुक्त वेतनत्रुटी उच्चस्तर समिती तसेच वेतन असमानता समितीच्या शिफारशी राज्य शासन निर्णयानुसार अंमलात आणल्या आहेत , या वेतनत्रुटी मध्ये आरेखक या पदांचा समावेश शासन शुद्धीपत्रकांमध्ये करण्यात आलेला होता , सदर संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनत्रुटीची थकबाकी प्राप्त झाली नव्हती , यामुळे सदर कर्मचाऱ्यांना वेतनत्रुटीची थकबाकी मिळावी याकरीता न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती , यावर न्यायालयाने थकबाकी देण्यात यावी असा निर्णय दिल्याने , राज्य शासनांकडून पुढीलप्रमाणे निर्णय दिला आहे .

वित्त विभागाच्या दिनांक 27.02.2006 आणि शासन शद्धीपत्रक दिनांक 24.01.2007 नुसार ग्राम विकास विभाग मार्फत जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या अनुरेखक , सहाय्यक आरेखक ( कनिष्ठ आरेखक ) , आरेखक आणि मुख्य आरेखक , तसेच कालबद्ध पदोन्नती योजना व आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी , पात्र अनुरेखक / सहाय्यक आरेखक ( कनिष्ठ आरेखक ) यांना पुन : सुधारित वेतनश्रेणीनुसार देय होणारी दिनांक 01.01.1996 ते दिनांक 31.03.2006 या कालावधीतील संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयातुन प्राप्त झालेल्या पत्रानुसार निश्चित करण्यात आलेली अंदाजित थकबाकी एकुण रुपये 6,17,05,740/- रुपये अदा करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे .

हे पण वाचा : मोठी बातमी ! महागाई भत्त्यामध्ये आणखी वाढ; जाणून घ्या या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल !

सदर अदा करण्यात येणारी थकबाकीची रक्कम ही संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ( GPF ) खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच दिनांक 01.01.1996 ते सदर आदेश निर्गमित होण्याच्या दिनांकाच्या कालावधीत जे संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा इतर कारणांमुळे सेवेत नाहीत अशांच्या बाबतीत सदर रक्कम रोखीनी प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर वेतनत्रुटी थकबाकी अदा करणेबाबत , दि.21.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !

शासन निर्णय ( GR )

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment