दांडीयात्रा : जुनी पेन्शन व इतर 12 प्रमुख मागणी करिता , राज्य कर्मचाऱ्यांचे उद्या दांडीयात्रा आंदोलन !

Spread the love

MTV marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Employee Strike ] राज्यातील कर्मचारी उद्या दिनांक 2 ऑक्टोबर 2023 , महात्मा गांधी जयंती निमित्त दांडी यात्रा आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत . यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर 12 मागणी करिता दांडी यात्रा आंदोलन करण्यात येणार आहेत .

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग मार्फत दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 02 ते 05 दरम्यान व्हेरायटी चौक ते संविधान चौक नागपूर या ठिकाणी दांडी यात्रा आंदोलन आयोजित केले आहेत . सदर आंदोलन लोकशाही मार्गाने दांडी यात्रा आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत . कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांना आव्हान करण्यात आले आहेत .

राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी , या प्रमुख मागणीसह कंत्राटी पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बाबतचा दिनांक 6 सप्टेंबर 2023 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करणे , दत्तक शाळा योजना संदर्भातील दिनांक 18 सप्टेंबर 2023 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा .

हे पण वाचा : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांने घेतला मोठा निर्णय , जाणुन घ्या आत्ताची मोठी बातमी !

त्याचबरोबर राज्यातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्याला आश्वासित प्रगती योजना सर्कसकट लागू करण्यात यावी . राज्यातील सर्व वेतन पथक कार्यालयाच्या महालेखाकार मार्फत लेखापरीक्षण करण्यात यावेत , तसेच आधार कार्ड नसलेले सर्वच विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावेत . त्याचबरोबर शासनाने मान्य केलेल्या अंशत : अनुदानित शाळांचे आदेश त्वरित वितरित करण्यात यावेत , त्याचबरोबर अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला करण्यात यावेत .

हे पण वाचा : नवरात्रीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! ही ब्रँडेड इलेक्ट्रिक स्कूटर पाहून आश्चर्यचकित व्हाल; किंमत फक्त एवढीच !

त्याचबरोबर संच मान्यता दुरुस्तीचे प्रकरणे त्वरित निकाली काढणे , तसेच राज्यातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी . तसेच बीएलओ आणि नवभारत साक्षरता कार्यक्रम , निरक्षर सर्वेक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे . तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात आणावेत . अशा प्रमुख मागणी करिता सदर दांडी यात्रा आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग मार्फत आयोजित करण्यात आला आहे.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment