MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ Sudharit Vetanshreni ] : नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 06.08.2002 च्या शासन निर्णयान्वये एकस्तर वेतनश्रेणी सुरु ठेवणेबाबत , अपर आयुक्त आदिवासी विकास मार्फत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दिनांक 25.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पदाकरीता एकस्तर पदोन्नतीबाबत वरील नमुद नमुद शासन निर्णयामध्ये पुढीलप्रमाणे तरतुद करण्यात आलेली आहे .आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अ ते ड मधील सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी / अधिकारी त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजिकची वरिष्ठ / पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुषंगाने वेतननिश्चितीचा लाभ देण्यात यावे अशी तरतुद करण्यात आली आहे .
तसेच ज्या कर्मचारी / अधिकाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यांना आणखी वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय नसणार आहे , ही एकस्तर पदोन्नतीचा योजना दिनांक 01 जुलै 2002 पासून अंमलात येईल आणि ती संबंधित कर्मचारी / अधिकारी आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच अनुज्ञेय असणार आहे .
हे पण वाचा : कर्मचारी वेतन बाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित !
त्या क्षेत्रातुन कर्मचारी / अधिकारी बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर तो त्यांच्या मुळच्या संवर्गातील वेतनश्रेणीत पुर्वीच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतन येईल .या तरतुदीनुसार एकस्तर पदोन्नतीचा लाभ संबधित कर्मचारी / अधिकारी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत अनुज्ञेय असणार आहे . त्यामुळे जरी या कार्यालयाचे स्तरावरुन नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीचा / आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आलेला असला तरी अश्या शिक्षकांना / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ते नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत त्यांना एकस्तर वेतनश्रेणीनुसार , वेतन सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच जे शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी नक्षलग्रसत क्षेत्रातुन बदलीने / पदोन्नती / सेवानिवृत्तीने / अन्यथा अन्य कारणाने बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर त्यांना मुळ संवर्गातील पदावरील अनुज्ञेय वरिष्ठ / निवड श्रेणीच्या / आश्वासित प्रगती योजनेच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चिती करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : राज्य कर्मचारी बाबत दि.25.09.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपूर्ण शासन निर्णय !
या संदर्भात अपर आयुक्त आदिवासी विकास मार्फत दिनांक 25.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !