(Old Pension) जुनी पेन्शन अहवाल मंत्रिमंडळासमोर , तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension ] : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु न करता राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) लागु करण्यात आलेली आहे . परंतु 100 टक्के अनुदानित नसलेल्या शाळांमधील अनेक कर्मचारी या लाभांपासुन अद्यापर्यंत वंचित आहेत .

सध्या राज्य शासनांकडून राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत अभ्यास समितीचे गठण करण्यात आलेले आहेत . या गठीत समितीच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्तांनी 100 टक्के अनुदानित नसलेल्या शाळांमधील दि.01 नोव्हेंबर 2005 पुर्वी रुजु झालेल्या शिक्षक – कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळावा याकरीता माहिती समितीकडे दिली आहे . सदर अहवाल राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये मांडण्यासाठी आमदार आसगावकरांनी पाठपुरावा सुरु केल्याची माहिती समोर येत आहे .

दिवाळीपुर्वी वेतन मिळणार : शिक्षकांना शालार्थ आयडी व 20 टक्के अनुदानाचा विषय मार्गी लागला आहे , परंतु सोलापुर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बाबतीत जावक क्रमांक , एफआयआर दाखल करणे , पदाची जाहीरात देण्याची अट तसेच शालार्थ आयडीचा निर्णय लवकरच मार्गी लाणार असल्याची ग्वाही आमदार जयंत आसगावकर यांनी दिली आहे , यामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना दिवाळीपुर्वी वेतनाचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .

हे पण वाचा : पेन्शन धारकांसाठी खुशखबर! पेन्शनचा नवीन नियम लागू; पहा शासन निर्णय!

30 सप्टेंबरला भव्य मोर्चा : त्याचबरोबर शाळांमधील रिक्त पदे हे तात्काळा भरावेत , कंत्राटी भरतीचा निर्णय हा रद्द करण्यात यावा , त्याचबरोबर शिक्षकांची अशैक्षणिक कामातुन कायमची सुटका करण्यात यावी अशा विविध मागण्या राज्य शासनांकडून मागण्या पुर्ण करुन घेण्यासाठी दि.30 सप्टैंबरला कोल्हापुर येथे भव्य मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे .

त्याचबरोबर राज्यातील अनुदानित / विना अनुदानित शाळांमधील विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्य शासनांकडून अभ्यास समिती गठीत करण्यात यावेत , जेणेकरुन शिक्षक – कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मार्गी लागतील , अशी मागणी करण्यात येत आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment