MTV marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension & Retirement Age upto 60 year ] : देशांमध्ये आतापर्यंत पंजाब , हिमाचल प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , पश्चिम बंगाल , त्याचबरोबर कर्नाटक मिझोराम या राज्य सरकारने जुनी पेन्शन लागु करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे . म्हणजेच ज्या राज्यांमध्ये काँग्रेस व इतर पक्षांची सत्ता आहे त्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात येत आहेत .
आंध्र प्रदेश राज्य सरकारने देखिल जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 35 टक्के रक्कम पेन्शन म्हणुन अदा करण्यात येत आहे , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान देखिल घेण्यात येत असते . तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ देण्यासाठी पुर्णपणे टाळाटाळ करत असल्याचे दिसुन येत आहेत . कारण दिनांक 14 मार्च रोजी राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ देण्यासाठी कमिटीचे गठण करण्यात आलेले होते .
या गठीत कमिटीची मुदत ही तीन महिन्यांची देण्यात आलेली होती , त्यास 14 जुन 2023 रोजी तीन महिने पुर्ण झाले , त्यानंतर राज्य शासनांने पुन्हा 02 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली , सदर 02 महिन्यांची मुदत ही दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी संपली . आता 15 ऑगस्ट तारीख देखिल निघुन गेली आहे , तरी देखिल राज्य शासनांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ देणेबाबत अद्याप पर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही . या वरुन असे दिसून येते कि , राज्य शासन राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यास चक्क टाळाटाळ करीत आहे , म्हणजेच जुनी पेन्शन लागु करण्याचा अद्याप सरकारचा कोणताही विचार नाही .
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा विचार राज्य शासनांच्या विचाराधिन : राज्यातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर खुशखबर देण्याकरीता राज्य शासनांने सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे मुख्य सचिव यांनी नमुद केले आहेत .यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये ( Retirement Age ) 02 वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ प्राप्त होणार आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून लवकरच अधिकृत्त अधिसुचना निर्गमित करण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !