वित्त विभागांकडून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि.15.09.2023 रोजी निर्गमित झाला दिलासादायक शासन निर्णय !

Spread the love

MTV marathipera , संगिता पवार प्रतिनिधी [ GR ] : राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये दिनांक 01 सप्टेंबर 2023 ते दिनांक 29.02.2024 पर्यंत अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑगस्ट 2023 व शुद्धीपत्रक दि.06.09.2023 नुसार वित्त विभाग व राज्य लॉटरी संचालनाच्या आस्थापनेवरील मंजूर 384 नियमित पदांपैकी 77 अस्थायी पदे + मृत संवर्गातील 38 कार्यरत पदे ( अधिसंख्य पदे – वित्त विभाग मधी शिपाई संवर्गातील 52 पैकी 31 कार्यरत पदे , वाहनचालक संवर्गातील 7 पैकी 3 कार्यरत व राज्य लॉटरी संचालनालयातील शिपाई संवर्गातील 4 पैकी 2 कार्यरत हमाल संवर्गातील 5 पैकी 2 कार्यरत अशा एकुण 115 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2023 ते दि.29.02.2024 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .सदर शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध पुढीप्रमाणे पाहता येईल .

सुधारित आकृतीबंधामध्ये वित्त विभाग ( खुद्द ) मधील अ.क्र 20 व 21 ( ब ) राज्य लॉटरी संचालनालयामधील अ.क्र 10 , 11 , व 12 येथील मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आली आहेत . सदर संवर्गात जितके कर्मचारी कार्यरत असतील तितकी पदे अधिसंख्य समजण्यात येवून सदर अधिसंख्य पद त्यावर कार्यरत व्यक्तीच्या सेवानिवृत्ती / राजीनाम / मृत्यु किंवा अन्य कारणामुळे रिक्त झान्यानंतर ते पद हे आपोआप रद्द होणार आहे .

या संदर्भातील वित्त विभागांकडून दिनांक 15.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविसतर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment