राज्यातील अधिकारी / कर्मचारी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दिनांक 26.09.2023

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotion Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देणेसंदर्भात राज्य शासनांच्या  उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भिय दिनांक 01.08.2019 मध्ये दिलेल्या सूचनांनुसार उच्च शिक्षण संचालनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय / महाविद्यालये / संस्था यामधील सहाच्या वेतन आयोगानुसार ज्या पदांचे ग्रेड वेतन हे 7,599/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे , अशा सर्व पदांसाठी आस्थापना मंडळाच्या कार्यकक्षेत नसलेल्या गट अ मधील सर्व पदांकरीता पदोन्नतीकरीता विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात येत आहेत .

सदर विभागीय पदोन्नती समितीचे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे आहेत – पदोन्नतीची शिफारस करण्यासाठी प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमाच्या तरतुदीनुसार व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना विचारात घेवून पदोन्नतीसाठी पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची तयार करुन नियुक्ती प्राधिकाऱ्यांस पदोन्नतीसाठी शिफारस करणे .

हे पण वाचा : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 3 टक्क्यांनी नव्हे तर 4 टक्क्यांनी वाढणार; पहा शासन निर्णय;

तसेच मानीव दिनांकाचे प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमाच्या तरतुदीनुसार व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना विचारात घेवून पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्यासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यास शिफारस करणे . , सदर शासन निर्णय तात्काळ अंमलात येत असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात उच्‍च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 26.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment