राज्य कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनानुसार डी.ए दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास ,सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याचे नियोजित !

Spread the love

MTV Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay Commission DA & HRA Rate News ] : सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताचे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्तामध्ये वाढ नियोजित आहे . सध्या माहे जानेवारी 2024 ची डी.ए वाढ बाकी आहे . याबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे .

महागाई भत्ता मध्ये 5 टक्के वाढ : सध्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून 46 टक्के दराने डी.ए लागु आहेत . तर माहे जानेवारी 2024 चे डी.ए वाढ अद्याप लागु करण्यात आलेले नाहीत . ऑल इंडिया ग्राह निर्देशांकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 ते 5 टक्के पर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे . जर पाच टक्के डी.ए वाढ केल्यास निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांचे एकुण डी.ए दर 51 टक्के होईल .

म्हणजेच महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक होईल , ज्यामुळे घरभाडे भत्ता मध्ये देखिल वाढ लागु होणार आहे . एकुण महागाई भत्ता हा 25 टक्के पेक्षा अधिक झाला तेंव्हा घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्यात आलेली होती , त्यानंतर डी.ए चे दर 50 टक्के पेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्याचे नियोजित करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : गट “क” संवर्गातील 142 जागांसाठी मोठी पदभरती..

सध्याच्या घडीला X , Y , Z श्रेणीतील कर्मचा-यांना अनुक्रमे 27 टक्के , 18 टक्के ,9 टक्के इतक्या प्रमाणात घरभाडे भत्ता मिळतो , आता डी.ए चे दर 50 टक्के पार करेल त्यावेळी अनुक्रमे श्रेणीनुसार 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के अशी सुधारणा होईल . ज्यामुळे डी.ए वाढीबरोबरच घरभाडे भत्ता मध्ये वाढी वाढ होईल .

डी.ए वाढीचा निर्णय कधी : माहे एप्रिल महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने , महागाई भत्ता वाढीचा निर्णय आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . आचारसंहिता पुढील महिन्यात 5 तारखेपासून नियोजित आहे . केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच राज्य सरकारकडून डी.ए वाढीचे निर्णय घेण्यात येतील .

Leave a Comment