MTV marathipepar [ Court Result , Old Pension ] : सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा देयके हे वेळेवर अदा करण्यात येत नसतात , अनेकवेळा तर देयके अदा करण्यास तब्बल 10-20 वर्षांचा कालावधी निघून जातो . यामुळे सदर कर्मचाऱ्यांस तत्कालिन महागाईच्या तुलनेत हवा तसा आर्थिक लाभ मिळत नाही . यामुळे मा. न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे .
श्री.नारायण गोसाई मत्ते हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण विका आणि जलसंधारण विभागांमध्ये भद्रावती येथे प्रकल्प अधिकारी म्हणुन कार्यरत होते . ते दिनांक 30.11.2004 रोजी वयाच्या 58 वर्षे पुर्ण झाल्याने नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले . सदर कर्मचारी हा सेवेत असताना सतत गैरहजर राहत असल्याने सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन व रजा रोखीकरणाची रक्कम अदा करण्यात आली नाही . यामुळे सदर कर्मचाऱ्यांने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरण नागरपुर खंडपीठ ( मॅट ) मध्ये याचिका दाखल केली .
सदर याचिकेवर दिनांक 01.08.2023 रोजी न्यायमुर्ती एम . जी गिरटकर ( उपाध्यक्ष ) निर्णय देत , सदर अर्जदारास मोठा दिलासा दिला .सदर कर्मचाऱ्यांस 2015 मध्ये पेन्शन आणि ग्रॅच्युईटीचा लाभ देण्यात आला होता , म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर तब्बल 11-13 वर्षानंतर सदर देण्यात आल्याने , सदर कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतरच्या दिनांकापासून 6 टक्के व्याजासह रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तर इतर देयके यावर 8 टक्के व्याजासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांस व इतर ( समान ) प्रलंबित प्रकरणबाबत , मोठा दिलासा प्राप्त झाला आहे . या सदंर्भात नागपुर खंडपीठाने दिलेला महत्वपुर्ण निर्णय सविस्तर ( PDF ) स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !