MTV marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [PMRSY] : प्रधानमंत्री सोलर रूफटॉप योजना. ही योजना सरकारची एक महत्वाची योजना असून या योजनेचा हाच उद्देश आहे की, भारत देशामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला चांगल्या प्रकारे चालना देणे. हे सोलर सिस्टिम घराच्या छतावर बसवण्याकरिता प्रशासन चांगलेच अनुदान देत आहे. तुम्ही घर मालक व्यवसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा मोठा फायदा होऊ शकतो.
सोलर रूफटॉप योजना ही 2015 मध्ये सुरू केली होती. तिथून पुढे संपूर्ण देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली आणि अगदी आश्चर्यकारकपणे ही योजना सफल झाली (solar rooftop scheme). भारत देशानी यापूर्वीच दहा गिगावॅटपेक्षा पेक्षा जास्त क्षमता असलेली सोलर सिस्टिम स्थापित केली आहे. ही सिस्टीम नक्कीच प्रभावी आहे. चला तर आपण सुद्धा या हरितक्रांतीमध्ये सामील होऊया आणि आपल्या सोबतच देशाची मोठी बचत करूया.
खालील स्टेप्स वापरून घरबसल्या सोलर सिस्टीम साठी अर्ज करा (solar rooftop scheme online apply);
Step 1 : सर्वात प्रथम तुम्हाला Sandes app हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. यामध्ये गेल्यानंतर तुमचे राज्य निवडायचे आहे. तसेच तुमच्या विभागातील वीज वितरण कंपनी कोणती आहे ती निवडा. तिथून पुढे वीज ग्राहक क्रमांक चा ऑप्शन भेटेल तो निवडा. तुमचा मोबाईल नंबर टाकून ई-मेल आयडी पण टाका आणि पोर्टलच्या निर्देशांक प्रमाणे सर्व स्टेप्स अनुसरण करा.
Step 2 : त्याच आपलिकेशन वरून ग्राहक क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक सोबत लॉगिन करायचे आहे आणि पुढे दिलेल्या फॉर्म प्रमाणे सोलर रूफटॉप योजनेसाठी अगदी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
हे पण वाचा : राज्यातील या तरुणांना मिळणार दरमहा 5 हजार रुपये! पात्र तरुणांची यादी पहा व अर्ज करा !
Step 3 : DISCOM च्या माध्यमातून व्यवहार्यता मंजुरीची प्रतीक्षा या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे (Free solar panel scheme by Government of India). एकदा तुम्हाला व्यवहारात मंजुरी मिळाली की तुमच्या DISCOM मधील असलेला नोंदणीकृत विक्रेता असेल त्याच्या माध्यमातून प्लांट स्थापित करून घ्या.
Step 4 : एकदा इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण झाली की, प्लांट तपशील या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि नेट मीटर साठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
Step 5 :नेट मीटर बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिस्कॉम च्या माध्यमातून पूर्णपणे तपासणी करून घ्या. त्यानंतर अधिकृत संकेतस्थळावरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया होईल.
पीएम सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत सोलर सिस्टिम बसवण्याचे फायदे : काही जास्तीचे पैसे तुम्हाला वाचवायची इच्छा असेल तर अशावेळी नक्कीच तुम्ही सोलर पॅनल च्या माध्यमातून तुमच्या घरासाठी किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायासाठी लागणारी जी काही वीज (Solar rooftop scheme in maharashtra) असेल ती निर्माण करू शकता. सौर ऊर्जेमुळे तुमचे वीज बिल पूर्णपणे कमी होईल.
सौर ऊर्जेचा वापर करा आणि पर्यावरणाच्या संबंधित तुमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडा. सौर ऊर्जा हा एक महत्त्वाचा अक्षय स्त्रोत असून तो अगदी शुन्य उत्सर्जन निर्माण करतो.
प्रधानमंत्री सोलर रूफटॉप योजना सध्या (PMRSY) महाराष्ट्र राज्यात चालू आहे का? : हो प्रधानमंत्री सोलर रूफटॉप योजना ही राज्यामध्ये चालू असून, या योजनेअंतर्गत सोलर सिस्टिम बसवण्यासाठी प्रशासन 30% पर्यंत सबसिडी देत आहे आणि या अनुदानाचा लाभ आपण निवासी स्थानासाठी किंवा व्यवसायासाठी घेऊ शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : तुमच्या वीज बिलाची प्रत या ठिकाणी असे दर्शवत आहे की, तुम्ही विजेचे ग्राहक आहात आणि नक्कीच तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे. अशावेळी तुमच्या ओळखपत्राची प्रत, तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र तुम्ही सादर करू शकता. सोबतच तुमच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत सुद्धा सादर करावी लागणार आहे. अशी आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना लागतील.
तसेच तुम्ही जे सोलर पॅनल आणि इतर साहित्य इन्स्टॉलेशन केले आहे. तर त्या संपूर्ण वस्तूंच्या किमतीची प्रत म्हणजेच बिल. तसेच इन्स्टॉलेशन चा खर्च या करारामध्ये सादर करावा लागेल. तसेच वॉरंटीचा कालावधी आणि सबसिडीची जी काही रक्कम असेल ते इन्स्टॉलेशनच्या अटी तसेच शरीरातील इत्यादी त्या ठिकाणी अर्ज करताना स्पष्टपणे नमूद कराव्यात.
अनुदान मिळवण्यासाठी किती कालावधी लागतो? :प्रधानमंत्री सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी जो कालावधी लागतो तो विविध राज्यानुसार बदलू शकतो. तरीही सर्वसाधारणपणे आपण जेव्हा अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करतो तिथून पुढे अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी 30 ते 60 दिवसांचा कालावधी लागू शकतो.