श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shravani somavar leave paripatrak ] : श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सोमवारच्या दिवशी दुपारच्या सत्रांमध्ये सुट्टी घोषित करणेबाबत , जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यालयामार्फत दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदरचा परिपत्रक हा राज्य शासनांच्या दिनांक 08.09.2015 रोजीच्या शासन निर्णयाच्या संदर्भिय निर्णयानुसार सादर करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात श्रावण ..

सोमवारी शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात ठेवण्याची विनंती शिक्षक संघटनामार्फत करण्यात आले आहेत . या संदर्भात पुर्वोदहारण देवू नये अशा निर्देशासह पुढीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : सफाई कर्मचारी , माळी , न्हावी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

RTE कायदा 2009 नुसार दररोज पाच तासांचे अध्यापन अनिवार्य असल्याने शाळेचे दैनंदिन शैक्षणिक कामकाजावर परिणाम होणान नाही व शाळेतील रोजच्या तासिका घेण्यात येतील या अटीवर श्रावण सोमवारी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा ह्या सकाळी 9.30 या वेळा ऐवजी सकाळी 7.00 ते 12.00 या वेळेत भरविण्याची मुख्याध्यापकांना मुभा देण्यात येत आहेत .

सदरचे परिपत्रक हे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद छ.संभाजीनगर यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहेत . याबाबतचा सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment