breaking news : मुंबई, लंडनमध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघ नखे भारत देशामध्ये परत आणण्यावरून महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे वाघ नखे नक्की शिवाजी महाराजांचेच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि हा प्रश्न सतत विरोधकांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. अशा या भानगडीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मूनगंटीवार हे वाघनख्यांबाबत एक वेगळा करार करण्यासाठी लंडनला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
याविषयी वस्तू संग्रहालया सोबत जो काही करार असेल तो करण्यासाठी मुख्यमंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत विभागाचे पथक रविवारी रात्री लंडनला निघाले आहेत. यासंदर्भात तीन ऑक्टोंबर रोजी करार पूर्ण होईल. परंतु वाघनख्यांवरून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे वार प्रति वार सुरू झाले आहेत. आता ही वाघ नखे नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत की नाही असा महत्त्वाचा प्रश्न ठाकरे गटाचे नेते माननीय आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जर ही वागणखे खरी असतील तर याचा पुरावा द्या (Today Breaking News).
सरकारने प्रजेसमोर आपले सत्य स्पष्ट करून दाखवावे. असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. ठाकरे यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वादग्रस्त लक्ष केंद्रित केले आहे. तसेच वाघ नखे खरे आहेत की खोटे आहेत हे सिद्ध करूनच दाखवा असे प्रति आवाहन शिवरायांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा :रिकाम्या जागेत मोबाईल टॉवर बसवून दरमहा कमवा 50 ते 70 हजार रुपये! पहा संपूर्ण प्रक्रिया !
दरम्यान आता हे वाघ नखे फक्त तीन वर्षासाठी भारत देशामध्ये आणले जातील असा खुलासा सुद्धा झाला आहे. परंतु कायमस्वरूपी भारत देशामध्ये वागणके आणण्यासाठी जो मत प्रयत्न सुरू आहेत यासाठी ब्रिटिश सरकारला वाघांची एक जोडी देण्याचा प्रस्ताव भेटीत सरकार समोर मांडला जाईल (news today live marathi). याची चर्चा समोर येत आहे. याविषयी लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी केली. रविवारी रात्री लंडन कडे प्रस्थान घेण्यापूर्वी मुनगंटीवार यांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे.
वाघनख्यांवरून वाद नको शरद पवारांचे मत; अशावेळी शरद पवार साहेब यांनी आपले मत व्यक्त केले असून, वाघनख्यांवरून कोणताही वाद निर्माण करावा असे मला अजिबात वाटत नाही. मराठी भाषेमधील इतिहासाची जानकारी व्यक्ती म्हणजे इंद्रजीत सावंत त्यांचे याबाबत काही मत असेल तर नक्कीच त्यांना विचारले पाहिजे. परंतु वाघनख्यांविषयी मला सुद्धा प्रत्यक्ष कोणती माहिती नाही. असे राष्ट्रवादी चे नेते खासदार शरद पवार यांनी माहिती सांगितली.
देवेंद्र फडणवीस यांचे मत, बलबुद्धीला कोणतेही उत्तर नाही : संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजनांकडे याबाबतचे पुरावे मागितले. त्यामुळे मला याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही (latest news today). त्यांची ती परंपराच आहे मी अशा बलबुद्धीला अजिबात उत्तर देत नाही. अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना फटकारले.
आदित्य ठाकरे यांचे मत, जनतेच्या भावनांशी खेळने बरे आहे का? : आपल्या इतिहासातील तसेच शिवरायांच्या संबंधातील एक महत्त्वपूर्ण वस्तू आपल्या महाराष्ट्रात येत असेल तर नक्कीच त्याचे मंदिर झाले पाहिजे. तसेच त्याचे जतन या ठिकाणी झाले पाहिजे. अशी शिवभक्ताची भावना दिसत आहे. परंतु सरकारने जनतेच्या भावनांसोबत खेळू नये. जर वाघनखे खरी असतील तर त्याचा पुरावा द्या. असे आवाहन ठाकरे गटाचे नेते यांनी सरकारसमोर केले आहेत.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मत; आदित्य ठाकरे यांनी वाघनखे खोटी आहेत का याचा पुरावा द्यावा. : वाघनखे खरी आहेत की नाहीत हे विचारण्यापेक्षा अधि ठाकरे यांनी ती खोटी आहेत का हे सिद्ध करून दाखवा. ज्या गोष्टींमुळे मराठी माणसांची अस्मिता पूर्णपणे जोडली गेली आहे. त्याचे राजकारण अजिबात न करता वाघनख्यांचे पूजन करा असे आवाहन शिवेंद्र राजे भोसले यांनी केल्याची माहिती समोर आली आहे