MTV marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employees service rules] : राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या प्रत्येक कर्मचारी हा संसदीय लोकशाहीमध्ये लोकसेवक असतो , त्यामुळे त्याने / तिने लोकांकरिता अथवा धर्मादायासाठी असलेल्या निधी किंवा राजकीयेतर व अनाक्षेपार्ह प्रयोजने असलेले निधी वगळता इतर कोणत्याही प्रयोजनासाठी असलेले निधी यासाठी वर्गणी मागू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांने कोणत्याही राजकीय चळवळीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेऊ नयेत. त्याचबरोबर आपले वैयक्तिक मत काहीही असले तरी , वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन हे त्याचे / तिचे आद्य कर्तव्य असेल . प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याने तिने प्रकृती चांगले ठेवण्याचा व आपले व्यक्तिमत्व हसरे व प्रसन्न बनवण्याचा प्रयत्न करावा तसेच प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून आपले कर्तव्य पार पाडण्याकरिता प्रयत्न करावेत.
प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी जरी त्यांच्यावर देखरेख करणारा अधिकारी जवळपास नसला तरी , आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी . प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्याला पगार व भत्ते या मार्गाने मिळत असलेले कायदेशीर मिळकतीवर संतुष्ट राहावे व गैरमार्गांना बळी पडू नये असे नमूद करण्यात आले आहे . त्याचबरोबर प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवावे की , शासनाचा कर्मचारी म्हणून त्यांनी उच्चतम दर्जाची नीतिमत्ता राखली पाहिजे म्हणून , त्याच्याकडून तिच्याकडून अपेक्षित असलेल्या आचारसंहितेच्या उल्लंघन होईल , अशी कोणतीही गोष्ट त्याने / तिने टाळावी .
हे पण वाचा : पुणे येथे 10 वी / 12 वी / पदवी पात्रता धारकांसाठी मोठी महाभरती 2024 !
शासकीय कर्मचाऱ्यांनी कामावर असताना किंवा रजेवर असताना स्वतः कोणत्याही व्यवसाय अथवा धंदा शासनाच्या परवानगीशिवाय करू नये , अथवा अशा धंद्याला किंवा उपक्रमाला मदत करण्यासाठी शासकीय कर्मचारी म्हणून आपल्या स्थानाचा उपयोग करू नये असे नमूद करण्यात आले आहे . त्याचबरोबर कार्यालयाबाहेर शासकीय कर्मचाऱ्यांची वर्तवणूक अगदी संशयातीत असावी . यामुळे त्याने तिने आपल्या कार्यालयामध्ये तसेच कारल्याबाहेर उच्च प्रकारची नैतिक वर्तन ठेवण्याचे नमूद केले आहेत .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024