उद्यापासून राज्यातील सर्व शाळांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी जाहीर ! परिपत्रक निर्गमित !

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार ( Public holiday) : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय यंत्रणेमधील / खाजगी यंत्रणेमधील शाळा / महाविद्यालय यांना उद्यापासून सलग पाच दिवस शासकीय सुट्टीची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे  .

या संदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेला आहे .उद्या दिनांक 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्यामुळे देशांमध्ये सार्वजनिक सुट्टीचे अधिकृत सार्वजनिक सुट्टी आहे , तर दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी मुस्लिम बांधवांचे ईद-ए-मिलाद हा मोठा सण येत असल्याने  , दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाकडून सार्वजनिक सुट्टीची अधिकृत घोषणा केली आहे . यामुळे राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा त्याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय / खाजगी शाळा तसेच महाविद्यालय यांना दिनांक 28 सप्टेंबर , 29 सप्टेंबर तर 30 सप्टेंबर रोजी शनिवार तर 01 ऑक्टोबर 2023 रोजी रविवार येत आहे .तर दिनांक 02 ऑक्टोबर 2023 रोजी गांधी जयंती आहे .

यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळा / महाविद्यालय त्याचबरोबर शासकीय यंत्रणांना उद्यापासून सलग पाच दिवस शासकीय सुट्टीचा लाभ मिळणार आहे . 28 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक सुट्टीच्या यादीमध्ये अधिकृत सुट्टी जाहीर होती . परंतु मुस्लिम बांधवांचा ” ईद-ए-मिलाद. ” हा सण दिनांक 29 सप्टेंबर या दिवशी येत असल्याने , राज्य शासनाकडून अधिकृत सुट्टीची घोषणा करण्यात आलेली आहे . या संदर्भात राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला अधिकृत शासन परिपत्रक आपण खालील प्रमाणे पाहू शकता..

हे पण वाचा : राज्यातील अधिकारी / कर्मचारी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दिनांक 26.09.2023

हे पण वाचा : खुशखबर! महागाई भत्ता वाढीसोबत मिळणार मोठी भेट; पगारातही इतकी वाढ; पहा संपूर्ण माहिती;

यामुळे राज्यातील सर्व शाळा /  महाविद्यालय त्याचबरोबर इतर शासकिय यंत्रणा यांना उद्यापासून 2 ऑक्टोबर पर्यंत 05 दिवस सुट्टी असणार आहे . राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांना देखील सुट्टीची मोठी सवलत मिळालेली आहे .

हे पण वाचा : गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद  सणानिमित्त सलग सुट्टीबाबतचा संभ्रम दुर , प्रशासनांकडून पत्रक निर्गमित !

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment