राज्यातील गरजु महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पिंक ( गुलाबी ) ई- रिक्षा उपलब्ध करुन देण्यास मान्यता ; GR निर्गमित ‍दि.31.07.2024

Spread the love

Mtv Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pink (Gulabi ) E-riksha yoajana ] : राज्यातील गरजु महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी पिंक ( गुलाबी ) ई- रिक्षा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 31 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्हवपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन शुद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ( गुलाबी ) ई-रिक्षा उपलब्ध करुन देणेबाबतच्या दिनांक 08 जुलै 2024 रोजीच्या निर्णयामध्ये अ.क्र10 येथील पिंक ई-रिक्षाचे Specification मध्ये महत्वहपुर्ण पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये Specification तक्यातील Motor Capacity 10  एचपी ऐवजी 2000 w पेक्षा जास्‍त नसावी असे वाचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर Seater  3+1  ( चालक ) ऐवजी 4 +1  ( चालक ) असे वाचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदर ई-रिक्षाची सामान्य वाहून नेण्याकरीता क्षमता ही 40 किलोपेक्षा अधिक नसावी असे नमुद करण्यात आले असून , सदर रिक्षांची वेग हा 25 किमी प्रति तास पेक्षा जास्त नसावा असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या शहरातील इच्छुक महिलांना मिळणार लाभ : अमरावती  , पिंपरी , मुंबई , अहमदनगर , कल्याण , नागपुर , नाशिक , पुणे , ठाणे , मंबई उपनगर  , चिंचवड , पनवेल , छत्रपती संभाजीनगर , डोंबिवली , वसई विरार , कोल्हापुर , सोलापुर या शहरातील इच्छुक गरिब महिलांना ई – रिक्षा पिंक गुलाबी ई- रिक्षा योजना अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Leave a Comment