MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Pavitra Portal Registration ] : शिक्षक होण्याचे स्वप्न बाळागणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य शासनांकडून पवित्र पोर्टल सुरु करण्यात आलेले आहेत .या पोर्टलवर उमेदवारांकडून नोंदणी करण्यात येत आहेत , परंतु यावर चुक होऊ नये याकरीता उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे . याकरीता राज्य सरकारकडून दिनांक 18.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण सुचना निर्गमित करण्यात आलेली आहे , सविस्तर सुचना पुढीलप्रमाणे आहेत .
01.उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करीता असताना , स्व- प्रमाणपत्रांमध्ये माहिती नमुद करीताना इयत्ता बारावीचे माध्यम कोणते होते ते नमुद करावेत , या बाबत उमेदवारांनी ई-मेल प्राप्त होत आहेत . या संदर्भात उमेदवारांनी इयत्ता 12 वीची शैक्षणिक अर्हता ज्या शाळेतुन / महाविद्यालयातुन प्राप्त केली असेल तेथून बारावीची माध्यम संदर्भात विचारणा करुन स्वप्रमाणपत्रांमध्ये योग्य ती माहिती भरावी ..
02.इयत्ता दहावी , बारावी , पदवी तसेच पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर व्यावसायिक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण गुणपत्रकावर CGPA / SGPA अशा प्रकारच्या श्रेणींमध्ये दिलेल्या असल्यास , या श्रेणींचे गुणांमध्ये रुपांतरण करण्याचे प्रत्येक संस्था / विद्यापीठ / बोर्डचे सुत्र हे वेगवेगळे आहेत . यामुळे उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी करीत असताना CGPA /SGPA श्रेणींचा बोर्ड / विद्यापीठ / संस्थाचे गुण रुपांतरणाचे सुत्र विचारात घेवूनच गुणांची नोंद पोर्टलवर करायची आहेत .
03.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 करीता आवेदन करण्यास कमी वेळ असल्याने उमेदवारांसाठी आवश्यक असणारी कागतपत्रे हे प्राप्त करण्याकरीता काळी अवधी लागणार असल्याने , दिनांक 31.03.2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती , परंतु दिनांक 31.03.2023 पूर्वीच बऱ्याच उमेदवारांनी माहे मार्च 2023 मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांचा संपामुळे कागतपत्रे काढण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या होत्या , या सर्व बाबींचा विचार करीता दिनांक 01.09.2023 रोजी पोर्टलवर दिल्यानुसार स्व- प्रमाणपत्राबाबत ( पोर्टलवर दिलेल्या सुचनेनुसार ) सध्यस्थितीमध्ये असणारी कागतपत्रे तसेच प्रमाणपत्रे विचारात घेवून कार्यवाही करण्यात येणार आहे .यामुळे स्व-प्रमाणपत्र पुर्ण करण्याच्या तारखेच्या अखेरपर्यंतच उपलब्ध असणाऱ्या कागतपत्रांचा विचार करण्यात येईल , सदर दिनांकानंतर उपलब्ध झालेल्या कागतपत्रांचा विचार केला जाणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
04.तसेच उमेदवारांना आपल्या जन्म तारीख यांमध्ये बदल करावयाचा असल्यास , उमेदवारांनी आवेदन केल्याच्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी यांना सदरचा उमेदवार आपणच असल्याचे सिद्धता करणेकामी जन्म तारखेचा पुरावा , प्रवेश पत्र , गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इ. प्रमाणपत्र घेवून संपर्क साधावा लागेच .
05.उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी जुना मोबाईल नंबर सध्या अस्थित्वात नसल्या कारणाने सध्या पोर्टलवर लॉगिन होत नसल्यास शिक्षण अधिकारी यांच्या लॉगीनवर अशा उमेदवारांसाठी लॉगिनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .याकरीता उमेदवारांनी आपला ओळखीचा पुरावा घेवून शिक्षणाधिकारी यांच्या संपर्क करावा लागेल .
06.ज्या उमेदवारांकडे इयत्ता दहावी , बारावीचे अर्हता प्रमाणपत्र नसल्यास अशा उमेदवारांनी समकक्ष असलेली अर्हता यांमध्ये 10 वी साठी पुर्व तयारी अभ्यासक्रम तर 12 वी साठी डिप्लोमा ( समकक्ष अर्हता ) ची नोंद करावी .त्यासोबत सदर अर्हता समकक्ष असल्याबाबत , पुरावे जोडावेत ..
07.माध्यम संदर्भात उमेदवारांकडून विचारणा होत आहे आहे कि , इयत्ता 10 वी चे माध्यम प्रथम भाषाकरीता असलेले माध्यम नियुक्ती ही इयत्ता पहिल ते पाचवी , इयत्ता 6 वी ते 8 वी , इयत्ता 9 वी ते 10 वी व इयत्ता 11 वी ते 12 वी अशा सर्व गटासाठी विचारात घेण्यात येणार आहे .