Breaking News : देशात वन नेशन वन डॉक्युमेंट संकल्पना , नविन कायदा लागु !

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [One Nation One Document ] : देशांमध्ये आता वन नेशन वन डॉक्युमेंटची संकल्पना बाबत जोरदार चर्चा सुरु आहे , यापुर्वी केंद्र सरकारकडून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना लागु करण्यात आली होती . आता वन नेशन वन डॉक्युमेंटची संकल्पना लागु करण्यात येणार आहे , या संदर्भात केंद्र सरकारकडून नविन कायदा पुढील महिन्‍यांपासून लागु करण्यात येणार आहे .

आता यापुढे जन्म प्रमाणपत्र हा एकच कागदपत्र महत्वपुर्ण ठरणार आहे . पुढील महीन्यांच्या दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 पासून नविन जन्म आणि मृत्यु सुधारणा कायदा 2023 देशभरांमध्ये लागु करण्यात येणार आहे .या सुधारित जन्म , मृत्यु सुधारणा कायदा 2023 नुसार यापुढे शैक्षणिक संस्थाच्या प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्र हा महत्वपुर्ण ठरणार आहे . तसेच मतदान यादी , आधार क्रमांक , लग्नाची नोंदणी , सरकारी नियूक्ती तसेच इतर सर्व कामांसाठी जन्म प्रमाणपत्र हे एकमेव कागदपत्राची आवश्यकता भासणार आहे .

आता जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्र अधिक पारदर्शक : जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्र आता डिजिटल स्वरुपातच मिळत आहेत , यामुळे यापुढे डिजिटल नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता वाढविण्यात येणार असल्याने केंद्र सरकारकडून विशेष डेटाबेस तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . जेणेकरुन डिजिटल नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता व कार्यक्षम वितरण करता येणार आहे .

जन्म व मृत्यु नोंदणी सुधारणा कायदा 2023 च्या कलम 1 ( 2 ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वार करुन केंद्र सरकारकडून दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 पासून सदर कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल असे अधिसुचनेमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .सदर सुधारित कायदा बाबतचे विधेयक हे पावसाळी अधिवेशनांमध्ये मंजुर करण्यात आलेले होते .

Leave a Comment