MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी , [ Old Pension Scheme ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय / निमशासकीय ( जिल्हा परीषद ) व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे .
सदर दाखल याचिकेवर दिनांक 20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयांमध्ये सुनावणी होती , सदर याचिका ही दिनांक 10.09.2018 रोजी दाखल करण्यात आली आहे , उच्च न्यायालयांमध्ये दाद न मिळाल्याने , सदर याचिका सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे . सदर याचिका राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या संबंधित असल्याने याचिकेची केस Category – 0601 Service Matters Retiral Benefits अशी आहे .
दिनांक 20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयांमध्ये काय झाले ? – काल दिनांक 20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयांमध्ये राज्यातील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) चा लाभ अनुभेय व्हावा याकरीता कर्मचाऱ्यांची बाजु ॲड. प्रदिप माधवराव महाले यांनी मांडली .
यावेळी ॲड. प्रदिप महाले यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजुने जुनी पेन्शन लागु करण्यात यावे , असा दाद मागितली असता , राज्याचे सरकारी वकिल यांनी प्रतिउत्तर करताना सांगितले कि , राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन आहे , याकरीता राज्य सरकारच्या अभ्यास समितीकडून अहवाल तयार करण्यात येत आहे .
यामुळे राज्य सरकारला आणखीन दोन महिन्यांची मुदत देण्यात यावी , अशी विनंती राज्य सरकारच्या सरकारी वकिल यांनी केली आहे .यामुळे यानंतरची पुढील सुनावणी ही दिनांक 06.12.2023 रोजी प्रस्तावित करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !