जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार! राज्य सरकारच्या मंत्रालयीन स्तरावर वेगवान हालचाली , मागितला दोन महिन्यांचा अवधी !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी  [ Old Pension ]  : एकीकडे सरकारने पेन्शन योजनेचा नियम बदलला आणि दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी संतापले. कारण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाई कडे बघता शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर खात्रीशीर पेमेंट भेटणे गरजेचे होते. या गोष्टीकडे लक्ष देऊन सरकारने बदललेला निर्णय माघारी घ्यावा आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करावी (pension scheme maharashtra government). अशी मागणी घेत शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली संपूर्ण आठवड्याभराची रजा टाकून शासकीय कर्मचारी तत्परतेने आंदोलन करतच होते. अशावेळी सरकारने सुद्धा वेगवेगळे निर्णय घेतले. परंतु अंतिम निर्णय हा स्पष्टपणे जाहीर झाला नाही. तर जुन्या पेन्शन योजनेबाबत सध्याचे महत्त्वाचे अपडेट आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Pension Yojana Maharashtra : मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी जुन्या पेन्शन योजनेबाबत शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये व सरकार मध्ये मोठी खळबळ उडाली होती. जुनी पेन्शन योजना आता पुन्हा महाराष्ट्र राज्यात लागू करावी. यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. याचा अर्थ असा होतो की आता राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारचा निर्णय लागू होईल. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर पुढे झाले असेल तर या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली जाईल.

जुनी पेन्शन योजना समिती; वित्त विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे नॅशनल पेन्शन सिस्टिम तसेच जुनी पेन्शन योजना यांची तुलना केली जाईल आणि या अभ्यासासाठी एक नोव्हेंबर 2005 रोजी शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय (pension scheme employer) कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अगदी खात्रीशीरपणे आर्थिक यासोबतच सामाजिक सुरक्षा अगदी सुनिश्चितपणे मिळवून दिले जाईल. यासाठी विविध उपाय योजना उपक्रम राबवली जातील.

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ वेळेवर न दिल्यास , विलंबामुळे देयके व्याजासह अदा करणेबाबत , मा. न्यायालयाने दिला मोठा निर्णय !

दिनांक 20.09.2023 रोजी  राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावीत या याचिकेवर सुनावणी झाली , यावेळी राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन महिन्यांत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment