MTV marathipepar , कविता पवार , प्रतिनिधी [ Employee Stike ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन , रिक्त पदे तात्काळ भरावेत तसेच किमान वेतन लागु करण्यात यावेत त्याचबरोबर पेन्शन धारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी इ. प्रमुख मागणीकरीता कर्मचारी, बेरोजगार , पेंशनर v शेतकरी कृती समिती यवतमाळ संघटनेमार्फत , संघर्ष मोर्चा आझाद मैदान यवतमाळ येथे दिनांक 24 सप्टैंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे .
प्रमुख मागण्या : DCPS /NPS धारक राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी , तसेच सर्व क्षेत्रातील कंत्राटीकरण रद्द करुन सर्व क्षेत्रातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावेत . तसेच शिक्षकांची 55,000 रिक्त पदे एकाच टप्यात तातडीने भरण्यात यावेत , तसेच आकृतीबंधानुसार सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावेत .
शासनाच्या सर्व क्षेत्रातील पदभरतीसाठी बेरोजगारांना स्पर्धापरिक्षा करीता राजस्थान सरकार प्रमाणे किमान शुल्क आकारण्यात यावेत . तसेच E.PS – 95 अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा 9,000/- व त्यावर महागाई भत्ता पेन्शन म्हणुन देण्यात यावेत .तसेच संपुर्ण देशात शेतकरी आत्महत्या करीता प्रसिद्ध झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी सरसकट विना हेक्टरी रुपये 50,000/- आर्थिक मदत देण्यात यावेत .
हे पण वाचा : नविन वेतन आयोग , महागाई भत्ता वाढ , वेतनवाढ इ.प्रमुख मागणीकरीता कर्मचारी संपावर !
तसेच स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी तात्काळ प्रभावाने लागु करण्यात यावेत , तसेच मागासवर्गीयांची सरळसेवा व पदोन्नती मधील रिक्त पदे आरक्षणाच्या धोरणानुसार तात्काळ भरण्यात यावेत .पेट्रोल , डिझेल , घरगुती गॅस जीवनाश्यक वस्तुंच्या किंमती कमी करुन महागाई नियंत्रणात आणावी , तसेच अशा वर्कर अंगणवाडी सेविका , शालेय पोषण कामगार , उमेद कर्मचारी या सर्व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रुपये 26,000/- रुपये किमान वेतन लागू करण्यात यावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !