MTV marathipepar , बालाजी पवार प्रतिनिधी ठाणे : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सातव्या वेतन आयोगात मोठी तफावत आढळून आल्या आहेत . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांमध्ये मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहेत .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत शिक्षण क्षेत्रात विभागांनुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये फरक असल्याचे आढळून आलेले आहेत . शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्या वेतनश्रेणींमध्ये मोठी तफावत असल्याचे आढळून आलेले आहेत . महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभाग , समाजकल्याण विभाग अंतर्गत कार्यरत प्रयोगशाळा सहाय्यक पदांना सातव्या वेतन आयोगानुसार एस-7 मध्ये 21,700-69,100/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे . ( 5200-20200 ग्रेड पे 2,000/- सहाव्या वेतन आयोगानुसार )
तर आदिवासी विभाग अंतर्ग कार्यरत प्रयोगशाळा सहाय्यक यांना सातव्या वेतन आयोगानुसार एस – 6 मध्ये 19,900-63,200/- या वेतनश्रेणी प्रमाणे वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे . या आदिवासी विकास विभाग मध्ये आणखीन विशेष म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक हे वर्ग 3 मध्ये तर प्रयोगशाळा परिचर हे वर्ग 4 मध्ये आहेत . तरी देखील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांची वेतनश्रेणी सारखीच देण्यात आले आहे .
एकस्तर वेतनश्रेणी : आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शाळा ह्या डोंगर / नक्षल ग्रस्त/ भागात येत असल्याने त्यांना एकतर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येतो , म्हणजेच पुढील पदोन्नती पदाची वेतनश्रेणी देण्यात येते , प्रयोगशाळा सहाय्यक हे पद एकाकी पद असल्याने मुळ वेतनश्रेणीची लगतची वेतनश्रेणी लागू करण्यात येते . यामुळे सदर विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदास एकस्तर वेतनश्रेणी लावून एस-7 मध्ये 21,700-69,100/- वेतनश्रेणी प्रमाणे वेतन दिले जात आहेत .
सदर पदाची इतर विभाग प्रमाणे जएस-7 मध्ये 21,700-69,100/- मूळ वेतनश्रेणी लागू केल्यास , एकस्तर वेतन 2400 ग्रेड प्रमाणे वेतनश्रेणी लागू होईल . परंतु असे नसल्याने, सदर आदिवासी विकास विभगातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे .
या विभगातील दुसरी विशेष बाब म्हणजे अनुदानीत आश्रमशाळा मधील प्रयोगशाळा सहाय्यक यांना एस-7 मध्ये 21,700-69,100/- या प्रमाणे मुळ वेतनश्रेणी लागू आहे , तर शासकिय आश्रमशाळा मधील प्रयोगशाळा सहाय्यक यांना एस – 6 मध्ये 19,900-63,200/- या वेतनश्रेणी प्रमाणे वेतन दिले जात आहेत .जे की अत्यंत चुकीची बाब असल्याने सदर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे .
त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग मध्ये कार्यरत ग्रंथपाल यांना इतर विभगातील ग्रंथालय पदाप्रमाणे वेतनश्रेणी लागू नाहीत . ग्रंथपाल पदास 2400 ग्रेड प्रमाणे वेतन दिले जाते जे कि. , 2800 ग्रेड पे प्रमाणे वेतन देणे आवश्यक आहे . सदर पदांची संख्या कमी असल्याने शासन दरबारी समस्या सोडविल्या जात नसल्याचे सदर पदावरील कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !