New Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग समितीचे गठण , पगारातील वाढ या संदर्भातील सविस्तर मोठी अपडेट जाणुन घ्या !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार [ New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दर दहा वर्षांनी फिक्स नविन वेतन आयोग लागु करण्यात आला आहे , देशाची आर्थिक प्रगती झपाट्याने वाढत आहे . त्या प्रमाणात सरकारी कर्मचारी तसेच इतर बाबींच्या खर्च करण्याची क्रयशक्ती त्या प्रमाणात समतोल करण्यासाठी पगारांमध्ये देखिल बदल करणे अपेक्षित आहे .

सन 2013 मध्ये तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळांमध्ये सातवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात आली होती , या समितीने आपला अहवाल सन 2016 मध्ये केंद्र सरकारला सादर केला . या सातवा वेतन आयोगाला अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर लोकसभेत देखिल एकमताने मंजुरी देण्यात आली . नविन वेतन आयोगाची स्थापना 2013 मध्येच करण्यात आली होती म्हणजेच तीन वर्षे अगोदरच नविन वेतन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती .

यानुसार विचार केला असता , आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये सन 2026 मध्ये सुधारित दराने मिळणे आवश्यक आहे म्हणजेच आठवा वेतन आयोग हा जानेवारी 2026 मध्येच लागु होणे अपेक्षित आहे . याकरीता सन 2024 मध्ये नविन वेतन आयोगाची ( आठवा वेतन आयोगाची ) स्थापना होणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : जुनी पेन्शनसाठी आता देशातील NPS धारक कर्मचारी एकवटले , दिल्ली येथे पेन्शन मागणीसाठी महा-आंदोलनाचे आयोजन !

आता देशांमध्ये सन 2024 मध्ये लोकसभेच्या तसेच देशातील बऱ्याच राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , याच पार्श्वभूमीवर  सरकार कडून नविन वेतन आयोगाची स्थापना लवकरच करण्यात येईल , ज्यामुळे देशातील कर्मचारी वर्गांची विद्यमान सरकारकडून सहानुभूती प्राप्त करतील .

काय म्हणाले वित्त राज्यमंत्री ? : केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत स्पष्ट केले आहेत कि , सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , सरकारकडून सहमती आहे , परंतु याबाबत तुर्तास कोणत्याही प्रकारची हालचाली सुरु नाहीत . परंतु याबाबत लवकरच केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून लवकरच अधिकृत्त निर्णय घेण्यात येईल .

मुळ वेतनातील वाढ : नविन वेतन आयोग लागु केल्यास , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार 3.68 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे विचार केला असता , किमान मुळ वेतनात 18,000/- रुपये वरुन 26,000/- रुपये अशी वाढ होईल . म्हणजेच मुळ वेतनांमध्ये 8,000/- रुपयांची वाढ होईल , त्याचबरोबर इतर देय वेतन , भत्ते यांमध्ये देखिल वाढ होईल .तर महाराष्ट्र राज्यतील सदर फिटमेंट फॅक्टरप्रमाणे विचार केला असता , किमान मुळ वेतन ( Basic Payment ) मध्ये 15,000/- वरुन वाढ होवून , 21,000/- रुपये अशी होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment