अखेर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.11.09.2023 रोजी निर्गमित झाला , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

MTV News : प्रणिता पवार , प्रतिनिधी – अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लाभ लागु करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिृत्तीवेतन निश्चित करणेबाबत , शासन निर्णय दिनांक 11.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या परिपत्रक वित्त विभाग दिनांक 28.06.2023 नुसार , दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत , मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत . सदरच्या सुचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्याऱ्या अशासकिय अनुदानित संस्थामधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

वित्त विभागाच्या सदर संदर्भाधीन पत्रानुसार दिलेल्या सुचना राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाच्या अधिपत्याखालील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम , द्विलक्षी अभ्यासक्रम व पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या अशासकीय अनुदानित संस्थामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागु करण्यात येत आहे , सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी आनंदाची बातमी येणार , सेवानिवृत्तीचे वाढून 60 वर्षे होणार !

सदर शासन निर्णयांमुळे राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालना अंतर्गत कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अखेर न्याय मिळाला आहे . या संदर्भात कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागांकडून दिनांक 11.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment