MTV marathipepar , प्रणिता पवार [ Public Holiday ] : दिनांक 28.09.2023 रोजी महाराष्ट्र शासनांच्या अधिकृत्त सुट्टींच्या यादींमध्ये सार्वजनिक सुट्टी आहे . दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन व ईद – ए – मिलाद हे सण एकाच दिवशी येत आहेत . राज्य शासनांने ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यासाठी दिनांक 29.09.2023 रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित केल्याने , विद्यार्थी / शासकीय कर्मचारी यांच्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु राज्य शासनांच्या परिपत्रकांमुळे हा संभ्रम दुर झाला आहे .
राज्य शासनांच्या सामान्य प्रशासनांकडून दिनांक 27.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत कि , दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी हिंदु धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे , अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येत . व तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदु बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होणार आहे .
याच दिवशी मुस्लिम बांधवांचा ई-ए-मिलाद हा मोठा सण येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे , यामुळे ऑल इंडिया खिलाफत कमीटीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून ईद -ए -मिलाद हा सण साजरा करण्याठी दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली , यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच निर्णय देत दिनांक 29 सप्टेंबर 2023 वार शुक्रवार रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे .
दिनांक 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केल्याने , दिनांक 28 सप्टेंबर रोजीच्या सुट्टीवर कोणताही परिणाम होणार नाही , कारण गणेश विसर्जन / अनंत चतुर्दशीची अधिकृत्त शासकीय सुट्टी आहे तर गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी येत असल्याने , राज्यात शांततेचे वातावरण असावे याकरीताच दोन्ही दिवस शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
सुट्टीबाबत संभ्रम दुर : यामुळे राज्यातील शाळा – महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणा यांना दि.28 सप्टेंबर व 29 सप्टेंबर अशी दोन दिवस सुट्टी असणार आहे .तर राज्यातील शासकीय यंत्रणामधील कर्मचाऱ्यांना दिनांक 28 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर पर्यंत सुट्टी असणार आहे .कारण शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असते , यामुळे आजपासून शासकीय कार्यालयांना सलग पाच दिवसांची सुट्टी असणार आहे .
सुट्टीबाबतचे निर्गमित करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अशाप्रकारे ज्या विभाग प्रमुख / जिल्हा प्रशासनाकडून गणेश विसर्जनाची सुट्टी जाहीर केली नाही अशा विभाग प्रमुख / जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाच्या अधिसूचना नुसार सुट्टी बाबत शुद्धीपत्रक काढण्यात येत आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !