कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या सन 2024 बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.10.04.2024

Spread the love

MTV Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Transfer Update Shasan Paripatrak ] : कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नांदेड माार्फत दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

ग्रामविकास विभागाकडील संदर्भाधीन शासन निर्णय , शुद्धीपत्रक व पुरकपत्रानुसार जिल्हा परिषदेच्या गट क ( वर्ग – 3 ) व गट ड ( वर्ग – 4 ) कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यां बाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेल्या बदल्यांची कार्यवाही पुर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , ग्रामविकास विभागाच्या दिनांक 15 मे 2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहेत .

सदर वेळापत्रकांनुसार कार्यसूची निश्चित करण्यात आलेली आहे . सदर वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहू शकता . गट विकास अधिकाऱ्यांनी संवर्गनिहाय वास्तव्य सेवाज्येष्ठता याद्या तयार करुन जिल्हा परिषदेस सादर करण्याची शेवटची दिनांक ही 12 एप्रिल 2024 , तर जिल्हा परिषदेचे मु.का.अ यांनी संवर्गनिहाय वास्तव्य सेवा ज्येष्ठता याद्या संबंधित गट विकास अधिकाऱ्यांकडून प्राप्‍त झाल्याच्या नंतर त्यांच्या एकत्रित वास्तव्य सेवाज्येष्ठता याद्या तयार करुन प्रसिद्ध करण्याचे शेवटची दिनांक ही 17 एप्रिल 2024 असणार आहे .

तर प्राथमिक वास्तव्य सेवाज्येष्ठता याद्या तयार करुन प्रसिद्ध झाल्यानंतर आक्षेप व सूचना मागविण्याचा कालावधी हा दिनांक 18 एप्रिल ते दिनांक 27 एप्रिल 2024 असा असणार आहे . तर आक्षेप व सुचनांचे निराकरण करुन अंतिम सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्याची शेवटची दिनांक ही 2 मे 2024 अशी असणार आहे .

हे पण वाचा : राज्यात सैनिक शाळा मध्ये विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

सर्वसाधारण बदल्या सन 2024 करीता नांदेड जिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती त्याचबरोबर बदलीमधून सुट / प्राधान्य , विनंती बदली इ. अर्ज सादर करण्याचे निर्देश सदर परिपत्रकांनुसार देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सामान्य प्रशासन विभाग , जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..  

Leave a Comment