कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.23.02.2024

Spread the love

MTV Marathipeper प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee imp Shasan Nirnay gr ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान वसुलीच्या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23.02.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार प्रतिनियुक्तीवरील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या रजा वेतन अंशदानाच्या रक्कमा ह्या त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या संपुर्ण कालावधीमधील वेतनाच्या आधारे परिगणित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच रजा वेतन अंशदानाचा दर सदर अधिकाऱ्याच्या मुळ वेतनाच्या 11 टक्के इतका असणार आहे .

त्याचबरोबर केंद्रीय कार्मिक तसेच प्रशिक्षण विभागाच्या दिनांक 09.10.2020 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार , 7 व्या वेतन आयोग प्रमाणे दिनांक 01 जानेवारी 2016 ते दिनांक 31 मार्च 2019 या कालावधीमधील निवृत्त वेतन अंशदानाचा दर हा भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार स्वीकारतेवेळी असणाऱ्या त्यांच्या वेतन स्तर मधील मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यावर 14 टक्के इतका निश्चित करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन पदभरती , Apply Now !

तसेच केंद्र शासनाच्या कार्यालयीन ज्ञापन नुसार दिनांक 01 एप्रिल 2019 पासून पुढे निवृत्ती वेतन अंशदानाचा दर मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यावर 18 टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे . तसेच रजा रजा वेतन अशंदाने व निवृत्ती वेतन अंशदाने ही शासनाकडे 02 स्वतंत्र लेखा शिर्षखाली भरणा करण्याची कार्यवाही असल्याने सदर रकमोंचे दोन स्वतंत्र धनाकर्ष रेखांकित करुन सहायक संचालक या नावे तयार करुन परिगणनेच्या संपुर्ण तपशिलासह विहीत मुदतीमध्ये या विभागास पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदानाचे धनाकर्ष सा.प्र.विभागाच्या कार्यासन भाप्रसे-4 कडे पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्था लेखा अधिकारी प्रशासकीय अधिकारी / वेतन अधिकारी यांची असणार असल्याची सूचित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडून दि.23.02.2024 रोजी निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment