राज्यातील “या”अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजना अंतर्गत जमा रक्कम  वर्ग करणेकामी अखेर नविन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता . GR दि.03.10.2023

Spread the love

 MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ Pension Scheme new GR ] : दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी “परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना” (Defined Contribution Pension Scheme) संदर्भ क्र. १ अन्वये लागू करण्यात आली.

शासन निर्णयांमध्ये नमुद  वित्त विभागाचे संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे नामकरण यापुढे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) असे करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयांमध्ये नमुद संदर्भाधीन क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर – १ ची अंमलबजावणी करणेसाठी आवश्यक कार्यपद्धती वित्त विभागाने विहित केली आहे.

तद्नुषंगाने राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानीत संस्थांमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) (स्तर १) लागू करण्याची कार्यपध्दती संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आली आहे. 

हे पण वाचा : महागाई भत्ता मध्ये वाढ , जाणुन घ्या सविस्तर अपडेट !

कृषि विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करतांना दरमहा जमा होणाऱ्या अंशदानाच्या रक्कमा केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडे वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. 

हे पण वाचा : अरे व्वा! फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून दरमहा मिळवा पेन्शन; जाणून घ्या गुंतवणुकीची भन्नाट स्कीम !

या नुसार राज्य शासनाने याप्रमाणे शासन निर्णय दिला आहे कि , कृषि विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करतांना दरमहा जमा होणाऱ्या अंशदानाच्या रक्कमा केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडे वर्ग करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे :- 

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment