MTV News : संगिता पवार , प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन नंतर सर्वात मोठी मागणी असणारे , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्य शासनांकडून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार , मागील महिन्यांमध्ये महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या समवेत झालेल्य बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली असून , या बाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी सकारात्मकता दर्शविली असून , तसा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्याचे आश्वासन दिले होते .राज्य शासनांकडून सदर प्रस्तावावर सविस्तर पणे चर्चा करण्यात येवून , निर्णय घेतला जाणार आहे .
भारतांमध्ये केंद्र सरकारी कर्मचारी त्याचबरोबर इतर 25 घटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे , याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी करीत आहेत .सेवानिवृत्तीच्या वय 60 वर्षे केल्यास , राज्यातील कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ अनुज्ञेय होईल .
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , पाठपुरावा करण्यात येत आहेत . जेणेकरुन राज्य सरकारला देखिल कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणे , भाग पडणार आहे .
निर्णय कधी होणार ? – सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ होणार पण , कधी ? असा प्रश्न राज्यातील कर्मचाऱ्यांना पडत आहे .कारण जे कर्मचाऱ्यारी सध्या सेवानिवृत्त होत आहेत , अशा कर्मचाऱ्यांना या लाभांपासून वंचित रहावे लागणार आहेत . यामुळे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत , राज्य शासनांकडून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा असे निवेदन विविध कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !