MTV marathipepar : संगिता पवार प्रतिनिधी , [GR] : विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतनावर व्याज अदा करणेबाबत , राज्य शासनांकडून महसूल व वन विभागांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.12 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
श्री. एस.बी. राठोड, सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी -१ हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१.०१.२०११ रोजी निवृत्त झाले आहेत. श्री. राठोड हे दुय्यम निबंधक, साक्री येथे कार्यरत असताना सन २००६ मध्ये लाच प्रकरणी त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यासंदर्भात त्यांचेविरुध्द सुरु असलेला कोर्ट स्पेशल केस क्र.०५/२००७ मध्ये मा.न्यायालयाचे दि.१९.११.२०११ रोजीच्या आदेशान्वये त्यांची निर्दोष मुक्तता केली.
श्री. राठोड यांचेवर सन २००७ मध्ये सुरु केलेल्या विभागीय चौकशी प्रकरणी दिलेल्या शिक्षा आदेशाविरुध्द श्री. राठोड यांनी मा.प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या मूळ अर्ज क्र.१७३/२०१५ मध्ये मा. न्यायाधिकरणाने पारित केलेल्या आदेशाचे अनुषंगाने, श्री. राठोड यांच्या शिक्षा व निलंबन कालावधी बाबतचा आदेश रद्द करण्यात येवून सेवानिवृत्ती वेतन, सेवानिवृत्ती उपदान, पेन्शन विक्रीची रक्कम, भ.नि.नि. ची अंतिम प्रदानाची रक्कम व माहे सप्टेंबर, २०१५ पर्यन्तचे नियमित तात्पुरते वेतन अदा करण्यात आले. सदरहू सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळण्यास उशीर झाल्याने विलंबाबत व्याजाची रक्कम अदा करण्याबाबत श्री. राठोड यांनी मा. प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ येथे मूळ अर्ज क्र.२३/२०२२ दाखल केला, होता यावर न्याायालयाने देयके विलंब झाल्याबद्दल व्याजासह वेतन लाभ अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णयान्वये श्री.एस.बी. राठोड, सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी-१, धुळे यांना विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती वेतनावर महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी परिगणीत केल्यानुसार , तरतूदीमधील प्राप्त अधिकारानुसार रुपये २,१९,२०७/- इतके व्याज प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
विलंबाने प्रदान करण्यात आलेले वेतनावर व्याज अदा करणेबाबत , महसूल व वन विभागांकडून दि.12.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !