Mtv marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yoajana form reject ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत काहींचे अर्ज हे रद्द होणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . अर्ज रद्द होण्याचे कारणे नेमके काय आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
या योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये तर वर्षाकाठी 18000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य होणार आहेत . याकरीता वय वर्षे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे . या योजना अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे . या योजनेचे विशेष म्हणजे पात्र ठरणाऱ्या महिलांना रक्षा बंधनच्या दिवशी पहिला हप्ता दिला जाणार आहे .
अर्ज सादर करण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरु आहे , यांमध्ये महिलांचे अर्ज रद्द होण्याची मोठी चर्चा मिडीया मध्ये सुरु आहे , या मागचे सत्य काढले असता .. ज्या खाजगी एजन्सीकडे सदर अर्ज मागविण्याचे ठेका देण्यात आले आहेत , या एजन्सीकडे अर्ज तपासण्यासाठी फक्त इंग्रजी भाषेचे कमांड आहेत . तर ज्यांनी सदर अर्ज मराठी भाषामधून भरले आहेत , अशांचे अर्ज रद्द ठरविले जातील , अशी माहिती समोर येत आहेत .
अनेकांना मराठी भाषेतून अर्ज भरले आहेत , यामुळे यावर राज्य शासनांकडून कोणता निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत . अर्ज सादर करताना मराठी भाषेचा पर्याय असल्याने , अनेकांनी मराठी भाषेतच अर्ज सादर केले आहेत . जर एजन्सीकडे अर्ज तपासण्याकरीता मराठी भाषेचे सॉफ्टवेअर नाही तर मराठीचा पर्याय कशामुळे देण्यात आला ? असा सवाल विचारण्यात येत आहेत .
हे पण वाचा : SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 1040 जागेसाठी महाभरती, लगेच करा आवेदन .
याबाबत राज्य शासनांकडून लवकरच उचित निर्णय घेण्याची शक्यता आहे , कारण ज्यांनी मराठी मध्ये अर्ज सादर केले अशांना परत अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिले जातील अथवा मराठीतुन भरलेले अर्ज तपासण्यासाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्याचे निर्देश सदर कंपनीस देण्यात येईल .
पात्र लाभार्थी बहीणींची यादी संबंधित जिल्हा / पालिका प्रशासनांच्या अधिकृत्त संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहेत , त्या ठिकाणावरुन पात्र लाभार्थ्यांची यादी मध्ये आपले नाव आहेत किंवा नाही ते पाहु शकता ..
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024