State Employee Leave Rules : राज्य कर्मचाऱ्यांना सेवाकाळांमध्ये काळ कारणास्तव रजेचे आवश्यकता भासत असते . किरकोळ कारणांसाठी किरकोळ रजा तर विशेष नैमित्तिक बाबीकरीता विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय करण्यात येत असते . राज्य शासनांकडून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजाविषय सुधारित नियमावलीनुसार नविन रजेचे नियम पुढीलप्रमाणे पाहुयात ..
किरकोळ रजा : किरकोळ ही एका कैलेंडर वर्षांमध्ये 08 दिवस घेता येते ,किरकोळ रजा हा रजेचा प्रकार नसल्याने , किरकोळ रजा घेत असताना कार्यालय प्रमुखांच्या पुर्व परवानगीची आवश्यक असते .कार्यालय प्रमुख प्रशासकीय कारणास्तव रजा नाकारु शकतो . कारण किरकोळ रजा ही कर्तव्य कालावधीमधून दिलेली तात्पुरती सुट असते , तर किरकोळ रजा सार्वजनिक सुट्टीस जोडून किंवा अधेमधे घेता येत असते . किरकोळ रजेची नोंद ही सेवापुस्तकांमध्ये करण्यात येत नाही , तर त्याकरीता स्वतंत्र नोंदवहीत नोंद केली जाते .
विशेष किरकोळ रजा : विशेष किरकोळ रजा ही कुटुंब नियोजनास प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येत असते , विशेष किरकोळ रजेची नोंद ही सेवापुस्तकांमध्ये घेण्यात येते . स्वत : वरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस पुरुष कर्मचाऱ्यांना 06 दिवसांची विशेष किरकोळ रजा मिळते , जर पहिल्यावेळी सदर शस्त्रक्रिया अपयशी ठरल्यास दुसऱ्या वेळी शस्त्रक्रियेस परत 06 दिवसांची विशेष किरकोळ रजा प्राप्त होते .
तर पत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान , पत्नीची काळजी / देखभालीसाठी पुरुष कर्मचाऱ्यास 07 दिवस विशेष किरकोळ रजा अनुज्ञेय होते . महिला कर्मचाऱ्यांस कायदेशिर रित्या गर्भपातानंतर शस्त्रक्रिया केल्यास सदर महिला कर्मचाऱ्यास 14 दिवसांची विशेष किरकोळ रजा अनुज्ञेय होते .
इतर काही विशेष नैमित्तिक रजा ( Special Casual Leave ) चे कारणे व प्रकार व किती दिवस रजा अनुज्ञेय होते , या संदर्भातील सविस्तर चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता …
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !