IMD : राज्यात पुढील 24 ते 48 तासांमध्ये या भागासाठी हवामान खात्याचा अतिसतर्कचा इशारा ; तुफान पावसाचा अंदाज !

Spread the love

MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ imd wether forecast for next 24 to 48 hours ] : राज्यात पुढील 24 ते 48 तासांसाठी भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . सविस्तर हवामान अंदाज पुढील प्रमाणे पाहुयात .

पुढील 24 तासांसाठी राज्यातील या भागांमध्ये कोळसणार अतिजोरदार पाऊस : राज्यात आज दिनांक 04 ऑगस्ट रोजी पुणे , सातारा , पालघर , मुंबई जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पाऊस कोसळणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . यामुळे सदर जिल्ह्यांना पाऊसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .

तर नाशिक , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापुर  या जिल्ह्यांना आज दिनांक 04 ऑगस्ट रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . तर लातुर जिल्हा वगळता संपुर्ण मराठवाडा व विदर्भासाठी पावसाचा दिनांक 04 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .

दिनांक 05 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यास हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . तर संपुर्ण विभाग , मराठवाडा व विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . तर दिनांक 06 ऑगस्ट रोजी पावसाचे प्रमाणे बरेचा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे .

रेड अलर्ट जिल्हे  पुढील 24 तासांमध्ये राज्यात पुणे , सातारा , पालघर , मुंबई या जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , या भागांमध्ये आज रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

Leave a Comment