MTV marathipepar , संगिता पवार : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देशातील लाखो NPS धारक कर्मचारी आता एकवटले आहेत , जुनी पेन्शन ही म्हातारपणातील आधार असल्याने , आपले पुढील आयुष्य सुकर करण्यासाठी NPS कर्मचाऱ्यांकडून आता राष्ट्रीय पातळीवर महा-आंदोलन करीत आहेत . दिनांक 01 ऑक्टोंबर रोजी दिल्ली येथे देशभरातील लाखो NPS धारक कर्मचारी आंदोलनास उपस्थित राहणार आहेत .
दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर जुनी पेन्शन लागु करावेत या प्रमुख मागणीकरीता राष्ट्रीय जुनी पेन्शन चळवळ संघटना तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व NMOPS संघटनेच्या वतीने , सदर पेन्शन शंखनाद महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . या महारैलीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांचा सक्रिय सहभाग असल्याने , राज्यभरातुन तब्बल 20-25 हजार कर्मचारी सदर महारैलीस सहभाग घेणार आहेत , याकरीता राज्य कर्मचाऱ्यांचे दिनांक 01 ऑक्टोंबर रोजी रितसर रजा घेतली जात आहे .
तर राज्यातील NPS धारकांसाठी प्रेरणास्त्रोत असणारे मालेगाव ( नाशिक ) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.आर.डी निकम सर हे राज्यातील एनपीएस धारकांसाठी जुनी पेन्शन योजना लागु करावेत याकरीता दि.01 ऑक्टोंबर रोजी दिल्ली येथील आंदोलनास उपस्थित राहण्यासाठी दि.03 सप्टेंबर पासून मुंबई ते दिल्ली असा सायकलने प्रवास सुरु केला आहे . यामुळे निकम सरांच्या या कार्यास देशाभरातुन सलाम करण्यात येत आहेत .
VOTE FOR OPS : कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच प्रलंबित अडचणी ह्या निवडणुकीच्या तोंडावरच सरकारकडून सोडविल्या जातात . आता सन 2024 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने , कर्मचाऱ्यांकडून जो पेन्शन लागु करेल त्यालाच मत देणार अशी भुमिका घेण्यात आली आहे .
दिल्ली येथे ही पेन्शन शंखनाद महारैलीचे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आलेले आहेत . जुनी पेन्शनच्या मागणीकरीता वेळोवेळी आंदोलन , रॅलीचे आयोजन करुन सरकारला वेळोवेळी आठवण करुन देण्याचे काम कर्मचारी संघटनेच्या माध्यमातुन होत आहे .या महारैलीस तब्बल 10 लाख कर्मचारी उपस्थित राहणार आहेत , तर राज्यातुन तब्बल 20-25 हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत , अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !