MTV marathipepar , संगिता पवार [ GPF INTREST RATE ] : अर्थ मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधी व्याजाचे नवे दर जाहीर करण्यात आलेले आहेत . सदरचे नवे दर हे जनरल प्रॉव्हिडंट फंड / जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि इतर प्रॉव्हिडंट फंडासाठी लागु असणार आहेत . या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता .
माहे ऑक्टोंबर – डिसेंबर 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 7.1 टक्के व्याजरद निश्चित करण्यात आलेला आहे . या संदर्भात अर्थ मंत्रालयांकडून अधिकृत्त घोषणा देखिल निर्गमित करुन , अर्थ मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे . तसेच इतर कर्जावरील ठेवी तसेच तत्सम निधी यावरील व्याजाचा दर देखिल 7.1 टक्के असणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
केंद्रीय अर्थ मंत्रालयांकडून सन 2023 च्या माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्या करीता GPF आणि लिंक्ड फंड यांचे व्याजदर ( Intrest Rate ) कायम ठेवण्यात आलेले होते . यांमध्ये केंद्रीय इतर फंड यांचे देखिल व्याजदर कायम ठेवण्यात आलेले आहेत . यांमध्ये अंशदायी भविष्य निर्वाह निधी , आखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी , राज्य रेल्वे भवष्यि निर्वाह निधी , भारतीय आयुध विभाग भविष्य निर्वाह निधी , जनरल प्रॉव्हिडंट फंड , आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड इ .फंडांचा समावेश आहे .
भारतातील फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना ददिला जाणार फंड ( GPF ) : जनरल प्रॉव्हिडंट फंड हा फक्त भारत देशातील सरकारी कर्मचाऱ्यांनाच दिला जात असणारा भविष्य निर्वाह निधी आहे . ज्यांमध्ये सरकारी कर्मचारी प्रत्येक महिन्याला यांमध्ये योगदार देत असतात . ज्यावर वार्षिक व्याजदर वेळोवेळी अर्थमंत्रायाकडून निश्चित करण्यात येत असते . जी रक्कम कर्मचाऱ्यांना विशिष्ट कारणास्तव, ठराविक कालावधीनंतर प्राप्त होत असते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !