7th Pay Commission : सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचारी मालामाल , डी.ए वाढीची नविन आकडेवारी व अपडेट आली समोर !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ DA NEWS ] :- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सणासुदीच्या काळांमध्ये डी.ए वाढी संदर्भात आनंदाची नविन आकडेवारी व अपडेट्स समोर आली आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा सणासुदीच्या काळांमध्ये आनंदा द्विगुणित होणार आहे .

महागाई भत्तामधील वाढ : –  केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये वाढ करणेबाबत , लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती मिडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे .महागाई भत्याची वाढ करणेबाबतची तारिख निश्चित केली गेली असली तरी , केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून डी.ए वाढीबाबतचा अधिकृत प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची मोठी माहिती सुत्रांनुसार हाती लागली आहे .

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने , सरकारकडून डी.ए वाढीबाबत नेमका मुहुर्त केव्हांचा असेल याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे . आता गणेश उत्सव , नवरात्री असे मोठे सण उत्सव जवळ येत आहेत यामुळे सरकारकडून लवकरच डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त घोषणा देखिल करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .

हे पण वाचा : 7 वा वेतन आयोगाचा 1,2,3 हप्ता अदा करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !

डी.ए किती वाढणार ?  माहे जुलै 2023 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना आणखीण 3 टक्के वाढीव डी.ए लागु करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर केल्यानंतर AICPI अंकांच्या आकडेवारीमध्ये 3.3 अंकांची वाढ झाल्याने एकुण निर्देशांक हा 139.7 वर जावून पाहोचला आहे .यामुळे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्यांची वाढ निश्चित करण्यात आली आहे .

सध्याची डी.ए आकडेवारी : सध्या सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लागु करण्यात येत आहे , आता यांमध्ये माहे जुलै 2023 पासून आणखीण तीन टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आली असल्याने एकुण डी.ए हा 45 टक्के होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment