खुशखबर! या नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणार फक्त 600 रुपयात; निवडणुकी अगोदर सरकारकडून मोठी भेट;

Spread the love

MTV marathipepar संगीता पवार [Ujjwala Yojana] : एन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने देशभरातील सर्वच नागरिकांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारच्या माध्यमातून उज्वला योजने अंतर्गत भरातील कोट्यावधी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने आता उज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरच्या सबसिडी मध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे अगदी कमी किमतीमध्ये काही नागरिक गॅस सिलेंडर घरी आणू शकतील.

या योजनेअंतर्गत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर फक्त आणि फक्त ग्राहकांना 600 रुपयात मिळणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मेझोराम या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे (Ujjwala Yojana subsidy). या निर्णयामुळे कित्येक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत जे अनुदान मिळत होते त्यामध्ये काही पात्र नागरिकांसाठी मोठी वाढ केली आहे. आत्तापर्यंत 200 रुपयांचे अनुदान प्रति सिलेंडर मागे ग्राहकांना दिले जात होते. परंतु थेट 300 रुपयांचे अनुदान या ठिकाणी देण्याचे निश्चित केले आहे (gas cylinder subsidy news). दिल्लीमधील उज्वला योजनेच्या लाभार्थी वर्गाला आता फक्त 600 रुपये मध्ये सिलेंडर मिळेल. मुंबईमध्ये सुद्धा 600 आणि कोलकत्ता मध्ये 630, तसेच चेन्नई मधील ग्राहकांना 620 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे. म्हणजे यंदाची दिवाळी नागरिक जोमात साजरी करू शकतील.

हे पण वाचा : अरे व्वा! फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून दरमहा मिळवा पेन्शन; जाणून घ्या गुंतवणुकीची भन्नाट स्कीम !

अनुदानामध्ये झाली मोठी वाढ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक बसवण्यात आली होती. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. त्यामधीलच हा एक महत्वपूर्ण निर्णय नागरिकांसाठी समाधानकारक ठरला. अशी महत्त्वाची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली (gas cylinder subsidy eligibility). मागील काही दिवसांपूर्वी काही कारणास्तव गॅस सिलेंडरच्या अनुदानामध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर चांगले वाढले होते. अशावेळी गॅस सिलेंडर 900 रुपयांपासून अकराशे रुपयांपर्यंत आपल्याला मिळत होते. परंतु त्यामध्ये आता आणखी अनुदान देण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे.

उज्वला योजनेचे जे कोणी लाभार्थी असतील त्यांना फक्त सातशे रुपयात गॅस सिलेंडर मिळू लागला. परंतु उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तींना तीनशे रुपयांच्या अनुदान या ठिकाणी मिळणार असल्यामुळे आता या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना फक्त 600 रुपयात गॅस सिलेंडर मिळेल. अशी महत्त्वपूर्ण माहिती ठाकूर यांनी दिली.

एका निर्णयामुळे कोट्यावधी कुटुंबीयांना फायदा : सरकारच्या आकडेवारीप्रमाणे देशभरामध्ये पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत तब्बल नऊ कोटी लाभार्थी आहेत. म्हणजेच आज जो निर्णय घेण्यात आला आहे त्याचा फायदा देशभरातील थेट 9 कोटी ग्राहकांना मिळणार आहे. पंतप्रधान उज्वला योजनेच्या माध्यमातून प्रशासन गरीब लोकांना अगदी सवलतीच्या दरामध्ये सिलेंडर पुरवत आहे आणि ही मोहीम मागील कित्येक वर्षांपासून तशीच सुरू आहे.

Leave a Comment