MTV marathipepar : संगीता पवार [OPS ] जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण , आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे देशामध्ये ज्या राज्याने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारली आहे , असे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार हळूहळू परत जुनी पेन्शन योजनेचा स्वीकार करीत आहेत .
देशामध्ये सन 2004 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS ) लागू करण्यात आली आहे , या योजनेचा स्वीकार महाराष्ट्र राज्यांमध्ये नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे . परंतु या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेस महाराष्ट्र राज्यासह देशांमध्ये इतर राज्यातील कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात विरोध करीत आहेत व जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मोठी मागणी करण्यात येत आहे .
देशामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार छत्तीसगड , राजस्थान , हिमाचल प्रदेश , पंजाब , कर्नाटक या राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू केली आहे . आता यामध्ये आणखीन एका राज्याची भर पडणार आहे . ती म्हणजे सिक्कीम राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन प्रणाली रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अहवाल तयार केला आहे .
हे पण वाचा : महागाई भत्ता वाढ बाबत आत्ताची मोठी अपडेट , वाचा सविस्तर बातमी !
सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी की , एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OLD PENSION ) लवकरच लागू होईल , अशी मोठी घोषणा केली आहे . यामुळे आता सिक्कीम राज्यातील सुमारे 30,000 NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे .
यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी देखील जूनी पेन्शन योजना मागणीसाठी अधिक आक्रमक भूमिकेमध्ये आंदोलन करतील व इतर राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केल्याप्रमाणे OPS लागू करण्यास राज्य सरकारला भाग पडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !