MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [Fitment Factor] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वाचा घटक असणारा , फिटमेंट फॅक्टर मध्ये तब्बल 3.68 पट वाढ करण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे . फिटमेंट फॅक्टर मधील वाढ ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये वाढ करते . तसेच फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय होईल .
सहावा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली होती , या प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हा 18,000/- रुपये इतका निश्चित झाला तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हा 15,000/- रुपये इतका निश्चित करण्यात आला . आता यांमध्ये 1.11 पट वाढ करण्याची मागणी कामगार युनियन कडून करण्यात येत आहेत .
3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतनश्रेणी ( नविन वेतन आयोगानुसार ) निश्चित केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतनांमध्ये 8,000/- रुपयांची वाढ होईल , म्हणजेच किमान मुळ वेतन हे 26,000/- रुपये इतके होईल , तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता 6,000/- रुपये इतकी वाढ होईल , म्हणजेच किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन 21,000/- इतका होईल . पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने , नविन वेतन आयोगाची स्थापना मोदी सरकारकडून लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .
हे पण वाचा : आता कर्मचाऱ्यांना पेंशन, PF , GRATUITY चा लाभ मिळणार नाही , नविन कायदा लागु !
तसेच कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्यातील डी.ए बाबत आत्ताची महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्त्यांमध्ये आणखीण 3 टक्क्यांची वाढ करणेबाबत केंद्र सरकारकडून या महिन्यांमध्येच अधिकृत कार्यालयन ज्ञापन निर्गमित केला जाणार असल्याची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे .
सध्याच्या घडीचा सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता ( DA ) मिळतो , तर आता यांमध्ये आणखीण 3 टक्यांची भर पडणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना एकुण 45 टक्के प्रमाणे महागाई भत्याचा लाभ अनुज्ञेय होईल . सदर 3 टक्के डी.ए वाढीचा लाभ केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !