आता सरकारला जुनी पेन्शन लागु करावीच लागणार ! दिल्ली येथे झालेल्या महा- शंखरॅली मध्ये कर्मचाऱ्यांनी दाखविले एकतेचे प्रदर्शन !

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme maha-shankhanad ] : दिल्ली येथील रामलील मैदान मध्ये राज्यातील सर्व राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी एकत्र आले होते .या आंदोलनातुन देशातील NPS धारक कर्मचाऱ्यांनी आपली एकतेचे प्रदर्शन केले आहेत .

या आंदोलनास देशाभरातुन तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आले होते , दिल्ली येथील एका आकडेवारीनुसार दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत दिल्ली मधील सर्व हॉटेल्स , लॉज , शाळा , धर्मशाळा कर्मचाऱ्यांच्या आगमनामुळे फुल झालेले होते .रामलीला मैदानावरील हे आंदोलन इतिहास जमा झाले आहे कारण आत्तापर्यंत अशा मोठ्या प्रमाणातील आंदोलन कधीच झाले नसल्याने मिडीया मध्ये मोठी चर्चा होत आहे .

कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी : देशाभरातील NPS धारक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून परत एकदा जुनी पेन्शन योजना सर्वांना सरसकट लागू करण्यात यावी . कारण राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अत्यल्प (कमी ) प्रमाणात पेन्शन (Pension ) मिळत आहे . तर जुनी पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होत असते . यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी पेन्शन लागू करावी अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे ..

दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली येथे देशभरातून कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना च्या मागणी करिता शंखनाद रॅली आयोजित केली होती , या आंदोलनाचे काही छायाचित्रे पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

हे पण वाचा : 7 th Pay Commissiion DA : सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढीबाबत अखेर प्रस्ताव तयार ! जाणून घ्या मोठी अपडेट !

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment