मोठी खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ October Paid In November Month Payment Big Update ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय / निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचारी ( शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ) यांच्या माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच्या पगारासोबत दोन मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत .

दिवाळी सण अग्रिम : नोव्हेंबर महिन्याच्या 4 तारखेपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे , या सणाच्या अनुषंगाने दरवर्षी सरकारी / निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून विशिष्ट रक्कम अग्रिम म्हणून देण्यात येते , जी कि विना व्याज परतावा असते . यामुळे सदर अग्रिमामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी सणांमध्ये मोठी आर्थिक मदत होत असते .

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी , रमजान ईद ,ख्रिसमस , पारसी नववर्ष , रोश – होशना , वैशाखी , स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इ.सणानिमित्त सण अग्रिम देण्याची तरतुद आहे .सण अग्रिमाची रक्कम ही राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून निश्चित करण्यात येते . परंतु मागील काही वर्षांपासून सण अग्रिमाची रक्कम 12,500/- अशी स्थिर आहे .

हे पण वाचा : खुशखबर! या कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार 60,000 रुपयांचा बोनस , जाणुन घ्या सविस्तर !

आता ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिवाळी सण अग्रिम म्हणून राज्य कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये अग्रिम वेतनासोबत मिळणार असून , सदर अग्रिमाची वसुली पुढील 10 महिन्यांमध्ये 1250/- प्रमाणे करण्यात येईल . या वर्षी महागाईचा विचार करुन राज्याचे मुख्यमंत्री सण अग्रिमाच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे .

दिवाळी सणानिमित्त वाढीव महागाई भत्ताचा लाभ : जुलै पासून राज्यातील कर्मचाऱ्यांना आणखीण 4 टक्के वाढीव डी.ए वाढीचा लाभ बाकी आहे , सदर डी.ए वाढीची घोषणा दिवाळी सणानिमित्त राज्य शासनांकडून करण्यात येईल . जेणेकरुन राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 42 टक्के वरुन चक्क 46 टक्के पर्यंत होणार आहे , म्हणजेच माहे ऑक्टोबर महीन्याच्या वेतनासोबत दिवाळी सण अग्रिम व वाढीव महागाई भत्याचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment