Corporate FD : गुंतवणूक आणि बचत या गोष्टींचा विचार केला तर मुदत ठेव म्हणजेच एफडी. हा पर्याय संपूर्ण देशभरात खूपच लोकप्रिय आहे. देशभरातील जास्तीत जास्त बँका तसेच टपाल कार्यालयांमध्ये एफडीच्या सुविधा आहेत. एफडी म्हणजे एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय. अशी नागरिकांची पूर्णपणे खात्री झाली आहे. या ठिकाणी ठराविक व्याजदराने गुंतवणुकीवर परतावा दिला जातो. परंतु बाजारपेठेत बँकांच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये सुद्धा एफडी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये बँकांपेक्षा जास्त व्याजदर दिले जात आहे.
कॉर्पोरेट एफडी म्हणजे नक्की काय? : कंपनीच्या माध्यमातून कॉर्पोरेट ग्राहकांना दिले जाते. बहुतेकपणे कॉर्पोरेट नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या तसेच गृहनिर्माण वित्त कंपन्यांच्या माध्यमातून जाहीर केल्या जातात. सर्वसाधारणपणे सहा महिन्यांपासून दहा वर्षापर्यंतच्या लॉक इन कालावधीमध्ये कॉर्पोरेट कंपन्या या संपूर्ण बाजारपेठेमधून पैसे उभा करण्यासाठी एफडी प्रदान करतात (Corporate FD rates). त्यामुळे गुंतवणूक करणारे नागरिक या योजनांकडे आकर्षित होतात आणि पारंपारिक तसेच इतर बँकांच्या व्याजदराच्या तुलनेत कंपन्या त्यांच्या एफडीवर भन्नाट व्याज मिळवून देतात.
बँक FD पेक्षा यात जास्त धोका का आहे? : मित्रांनो गुंतवणूक करण्याआधी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे ती म्हणजे कॉर्पोरेट एफडी ही इतर बँकांच्या एफडी पेक्षा थोडीसी रिस्की असू शकते. कारण की कॉर्पोरेट आरबीआयच्या सहाय्यक तसेच डीआयसीजीसी च्या माध्यमातून प्रधान करण्यात आलेल्या ठेव विमा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे एफडी मध्ये मात्र गुंतवणूकदार करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवीवर पाच लाख रुपये पर्यंतचा विमा संरक्षण मिळतो. म्हणजे जरी बँक बंद झाली तरी तुमची पाच लाख रुपयांची रक्कम अगदी सुरक्षित राहते.
कॉरपोरेट FD साठी आवश्यक डॉक्युमेंट्स; कॉर्पोरेट एफडी चा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे आवश्यक कागदपत्रे आपल्याला सादर करावे लागतील. ती म्हणजे अर्ज करणारे व्यक्तीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटर आयडी, ऍड्रेस प्रूफ, पासपोर्ट पॅन कार्ड, तसेच दोन आयडेंटी साईज कलर फोटो.