MTV marathipepar : संगिता पवार [ GR ] – समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) ही केंद्र पुरस्कृत (६०:४०) योजना आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष २२०२ आय ६१२ अंतर्गत ०१ वेतन उद्दिष्टाखाली एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीसाठी सन २०२३ – २४ करिता अर्थसंकल्पीत रकमेपैकी २० टक्के प्रमाणे रु.९,३३,८९,६००/- इतकी तरतूद , वितरीत करण्यात आली. तथापि, सदर रकमेतून माहे मे व जून २०२३ या महिन्यांचे वेतन अदा न झाल्याने , माहे मे व जून – २०२३ कालावधीतील प्रलंबित वेतन व माहे जुलै २०२३ चे नियमित वेतनाकरिता रु. १४,००,८४,४००/- एवढी तरतूद वितरीत करण्यात आली होती.
तदनंतर राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे माहे- ऑगस्ट, सप्टेंबर, २०२३ चे नियमित वेतन व सातवा वेतन आयोग फरक थकबाकीचा ४ था हप्ता अदा करण्याच्या अनुषंगाने रु. १२५२.६२ लक्ष एवढी तरतूद उपलब्ध करुन देणेबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असता, वित्त विभागाने सन २०२३ – २४ करिता अर्थसंकल्पीत तरतूदीच्या ७० टक्के प्रमाणे निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णयान्वये २० टक्के तर संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये ३० टक्के तरतूद यापूर्वीच वितरीत करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे माहे-ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ चे नियमित वेतन अदा करण्यास्तव उर्वरीत २० टक्के प्रमाणे रु.९,३३,८९,६००/- इतकी तरतूद वितरीत करण्याच्या अनुषंगाने, वित्त विभागाने दिनांक ६ मे २०२२ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या मार्गदर्शनानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत (६०:४०) योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष २२०२ आय ६१२ अंतर्गत ०१ वेतन उद्दिष्टाखाली सन २०२३-२४ करिता अर्थसंकल्पीत रकमेपैकी माहे ऑगस्ट व सप्टेंबर – २०२३ चे नियमित वेतन अदा करण्याकरिता एकूण रु. ९,३३,८९,६००/- (रुपये नऊ कोटी तेहतीस लक्ष एकोणनव्वद हजार सहाशे फक्त) इतकी तरतूद वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
वित्त विभागाने दिनांक ६ मे २०२२ च्या पत्रान्वये केलेल्या मार्गदर्शनानुसार सदर अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च सुरुवातीला राज्य हिश्श्याच्या लेखाशिर्षांतर्गत ०१ वेतन उद्दीष्टांतर्गत तरतूदीमधून करण्यात येत आहे. तसेच सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनाखाली होणाऱ्या कपातीच्या नोंदी जसे GPF, GIS, Income Tax इ. राज्यातील HRMS / IFMIS (सेवार्थ प्रणाली) मध्ये ठेवण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत .
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांची वेतन तरतुद अदा करणेबाबचा सविस्तर शासन निणय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !