7 th Pay Commissiion DA : सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढीबाबत अखेर प्रस्ताव तयार ! जाणून घ्या मोठी अपडेट !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ 7 th Pay Commission DA ] : सातवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी ते जुन या कालावधीसाठी 4 टक्यांची वाढ लागु करण्यात आली . केंद्र सरकारीन घेतलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने देशांमध्ये बऱ्याच राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ लागु केली .

या राज्य सरकारने लागु केली 4 टक्के डी.ए वाढ : केंद्र सरकारच्या डी.ए वाढीच्या निर्णयानंतर गुजरात , महाराष्ट्र राज्य ,मध्य प्रदेश , सिक्कीम , ओडिशा , कर्नाटक , झारखंड , हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये माहे जानेवारी ते जुलै या कालावधीकरीता 04 टक्यांची वाढ लागु केली आहे .यामुळे सदर राज्यातील कर्मचाऱ्यांना आता 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ मिळत आहे .

जुलै ते डिसेंबर काळातील डी.ए वाढीची होणार घोषणा : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्ता वाढ बाबत , घोषणा अद्याप बाकी आहे . जुलै ते डिसेंबर या टप्यातील डी.ए वाढ ही 3 ते 4 टक्यांची वाढ असणार आहे . सदर वाढ ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात आलेली आहे .

वित्त मंत्रालयाकडून अधिकृत्त प्रस्ताव तयार : महागाई भत्तामध्ये वाढ करणेबाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून अधिकृत्त प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची मोठी बातमी सुत्रानुसार हाती लागत आहे . सदर प्रस्तावास कॅबिनेट मंत्रीमंडळाची मंजुरी बाकी आहे . या संदर्भातील कार्यालयीन ज्ञापन हे माहे सप्टेंबर महिन्यांच्या अखेपर्यंतच निर्गमित केला जाण्याची शक्यता वर्तविली जात होती , परंतु काही कारणास्तव डी.ए वाढीबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : अरे व्वा ! या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमोशन लवकरच ; पहा कोण असतील पात्र ? वाचा सविस्तर;

कधी होईल अधिकृत्त निर्णय : सदर डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय आता दसरा सणापर्यंत जावून पोहोचेल कारण याबाबत आता निर्णय झाला तरी माहे ऑक्टोंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत प्रत्यक्ष अदा करण्यात येईल . यामुळे ऑक्टोंबर महिन्यांच्या अखेपर्यंत डी.ए वाढीस अखेरचा मुहुर्त आहे . ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांस सणासुदीस डी.ए वाढमुळे , मोठा आर्थिक लाभ होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment