MTV marathipepar प्रणिता पवार [ Maharashtra Government Scheme ] : मागील कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र सोबत संपूर्ण देशभरामध्ये बेरोजगार युवकांची संख्या चांगलीच वाढत चालली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अनेक युवकांना नोकरीचा हातभार लागत नाही. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यांमध्ये सुद्धा अशा बेरोजगार युवकांची संख्या जास्त आहे. यामुळेच बेरोजगार युवकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतो.
अशा परिस्थितीमध्ये राज्यभरातील बेरोजगार युवक यांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्रशासनाने एक महत्त्वाची योजना राबवली आहे. राज्य शासना अंतर्गत राज्यभरातील बेरोजगार तरुण वर्गाचा उदर निर्वाह चांगल्या प्रकारे होण्यासाठी बेरोजगार भत्ता योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार नवयुवकांना प्रति महिन्यात पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.
या योजनेच्या माध्यमातून प्रदान केल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून राज्यभरातील बेरोजगार नागरिकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे. निश्चितपणे महाराष्ट्र राज्य प्रशासनाने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार वर्गासाठी योजना फायदेशीर ठरू शकते. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप तसेच बेरोजगार योजनेसाठी पात्र ठरणारे व्यक्ती याविषयी तपशील वर माहिती जाणून घेऊया.
कसे असेल योजनेचे स्वरूप ? :तसे पाहता दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या तसेच वाढत्या यांत्रिकीकरणामुळे अनेक उच्चशिक्षित तरुण वर्गाचा नोकरीचा प्रश्न हा मार्गी लागत नाही (State Government schemes). यांत्रिकीकरणामुळे आता दहा माणसांचे काम हे फक्त एक मनुष्य करत आहे आणि हेच महत्त्वाचे कारण म्हणजे मनुष्यबळाची गरज सध्या अगदी कमी लागत आहे.
याचा विशेष भाग म्हणजे आगामी काळामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. तसेच टेक्नॉलॉजीमुळे मोठ मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कपात होण्याची शक्यता वाढ झाली आहे (Government schemes 2023). विशेष भाग म्हणजे कोरोना कालखंडामध्ये कित्येक रोजगार वर्ग बेरोजगार झाला आहे आणि नामांकित कंपन्या या नाशिवंत झाले आहेत. त्यामुळे नोकरदारांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा मार्गी लागणे सहच शक्य नसते.
म्हणूनच आता राज्यभरातील बेरोजगार वर्गाला दिलासा देण्याकरिता प्रशासनाने महाराष्ट्र राज्य बेरोजगार भत्ता योजना नव्याने राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांच्या रक्कम पात्र तरुण वर्गाला दिली जाईल (maharashtra government schemes list). याचा विशेष भाग म्हणजे प्रत्येक महिन्याला दिली जाणारी जी काही पाच हजार रुपयांची रक्कम जोपर्यंत बेरोजगार तरुण वर्गाला नोकरी लागत नाही तोपर्यंत ही रक्कम अशीच मिळत राहील.
कोणकोणते युवक असतील पात्र? :ह्या बेरोजगार भत्त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, अर्ज करणारा व्यक्ती कोणत्याही शासकीय नियम शासकीय किंवा व्यवसाय मध्ये नसावा, तसेच अर्ज करणारे व्यक्तीकडे अद्याप कोणतेही उत्पन्नाचे साधन नसावे, अर्ज करणारे व्यक्तीचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे व जास्तीत जास्त 35 वर्षे असावे, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे (Maharashtra Government Schemes for students). तसेच अर्ज करणारी व्यक्ती ही कमीत कमी बारावी उत्तीर्ण असावी.